कोरोना: चार जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा व कराड येथे घेतलेल्या चार कोरोना संशयितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कोरोना: चार जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

इस्लामपूर येथील पॉझिटिव्ह  रुग्णांच्या संपर्कातील
2 सहवासितांचा रिपोर्ट निगेटीव्ह
सातारा /जिमाका
 सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 2 निकट सहवासितांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
–-------- ------     -----     
कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजच्या विलगीकरण कक्षात दाखल  2 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह 

सातारा /जिमाका
  कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे विलगीकरण कक्षात सातारा जिल्ह्यातील 3 वर्षीय मुलाला ताप, खोकला, श्वसनास त्रास होत असल्याने व 15 वर्षीय मुलीला ताप, खोकला असल्याने दाखल केलेल्या 2 रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
†******************