DVM Special : एकटेपणाच्या जाळ्यात ओढतो डेटिंग अॅप्सचा वापर

वॉशिंग्टन : डेटिंग अॅप्सवर सर्फिंग करणारे एकटेपणाचे आणि चिंतेचे शिकार होतात. एवढेच नव्हे, तर अशा लोकांमध्ये नैराश्याची लक्षणेही दिसून येतात. ओहायो विद्यापीठाच्या कॅथरीन कोडक्टो यांच्या म्हणण्यानुसार, डेटिंग अॅप्सचा वापर करणारे केवळ फोनचा अधिक वापर करतात असे नाही, तर त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना असे अनेक जण आढळून आले ज्यांना शाळा, महाविद्यालय आणि कामावरही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सतत फोन तपासत राहणे हे त्याचे कारण होते. शाळा आणि महाविद्यालयांतील कित्येक विद्यार्थ्यांनी यामुळे क्लासला दांडी मारली आणि ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करू न शकणाऱ्या अनेकांची नोकरी धोक्यात आली. कॅथरीन यांनी या अभ्यासात अशा २६९ अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते, जे एकापेक्षा अधिक डेटिंग अॅप्सचा वापर करत होते.लोकांनी मान्य केले- या अॅप्सचा वापर कमी करणे अवघडकॅथरीन यांनी सांगितले, 'मी अनेक लोकांना फोनवर वेड्यासारखे हे अॅप्स वापरताना पाहिले. लंच वा डिनरसाठी बाहेर जात असो की मित्रांबरोबर मजा मस्ती करत असो, ते खिशातून फोन काढून तपासायला विसरत नाहीत. त्यांना मित्रांबरोबर निवांत क्षण घालवण्यापेक्षा मोबाइल स्वाइप करणे जास्त आवडते.' या अभ्यासात सर्वांना विचारले गेले की, तुम्हाला एकटेपणा किती जाणवतो किंवा लोकांंमध्ये असताना निराशा जाणवते का? सहभागी व्यक्तींना असेही विचारले की, या डेटिंग अॅप्सवर ते घालवत असलेला वेळ कमी करण्याचा प्रयत्न करतात का? यावर त्यांचे म्हणणे होते की, सतत फोन वापरण्यामुळे त्यांना क्लासला दांडी मारणे, कामावर न जाणे आणि अनारोग्य अशा अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागते. यात असेही आढळून आले की, लोकांना समोरासमोर भेटण्यास घाबरणाऱ्या लोकांना डेटिंग पार्टनरला समोरासमोर भेटण्यापेक्षा ऑनलाइन चॅटिंग करण्यात जास्त आत्मविश्वास जाणवतो. कॅथरीन म्हणतात की, डेटिंग अॅप्सच्या वापरामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येत आहेत, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. ते या अॅप्सचा वापर बंद करू शकत नसतील तर सतत फोन वापरण्याची सवय सुटण्यासाठी तो वापरण्याची एक मर्यादित वेळ ठरवू शकतात. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today DVM Special : The Use of Dating Apps pulls In The Trap Of Loneliness


 DVM Special : एकटेपणाच्या जाळ्यात ओढतो डेटिंग अॅप्सचा वापर

वॉशिंग्टन : डेटिंग अॅप्सवर सर्फिंग करणारे एकटेपणाचे आणि चिंतेचे शिकार होतात. एवढेच नव्हे, तर अशा लोकांमध्ये नैराश्याची लक्षणेही दिसून येतात. ओहायो विद्यापीठाच्या कॅथरीन कोडक्टो यांच्या म्हणण्यानुसार, डेटिंग अॅप्सचा वापर करणारे केवळ फोनचा अधिक वापर करतात असे नाही, तर त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना असे अनेक जण आढळून आले ज्यांना शाळा, महाविद्यालय आणि कामावरही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सतत फोन तपासत राहणे हे त्याचे कारण होते. शाळा आणि महाविद्यालयांतील कित्येक विद्यार्थ्यांनी यामुळे क्लासला दांडी मारली आणि ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करू न शकणाऱ्या अनेकांची नोकरी धोक्यात आली. कॅथरीन यांनी या अभ्यासात अशा २६९ अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते, जे एकापेक्षा अधिक डेटिंग अॅप्सचा वापर करत होते.
लोकांनी मान्य केले- या अॅप्सचा वापर कमी करणे अवघड


कॅथरीन यांनी सांगितले, 'मी अनेक लोकांना फोनवर वेड्यासारखे हे अॅप्स वापरताना पाहिले. लंच वा डिनरसाठी बाहेर जात असो की मित्रांबरोबर मजा मस्ती करत असो, ते खिशातून फोन काढून तपासायला विसरत नाहीत. त्यांना मित्रांबरोबर निवांत क्षण घालवण्यापेक्षा मोबाइल स्वाइप करणे जास्त आवडते.' या अभ्यासात सर्वांना विचारले गेले की, तुम्हाला एकटेपणा किती जाणवतो किंवा लोकांंमध्ये असताना निराशा जाणवते का? सहभागी व्यक्तींना असेही विचारले की, या डेटिंग अॅप्सवर ते घालवत असलेला वेळ कमी करण्याचा प्रयत्न करतात का? यावर त्यांचे म्हणणे होते की, सतत फोन वापरण्यामुळे त्यांना क्लासला दांडी मारणे, कामावर न जाणे आणि अनारोग्य अशा अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागते. यात असेही आढळून आले की, लोकांना समोरासमोर भेटण्यास घाबरणाऱ्या लोकांना डेटिंग पार्टनरला समोरासमोर भेटण्यापेक्षा ऑनलाइन चॅटिंग करण्यात जास्त आत्मविश्वास जाणवतो. कॅथरीन म्हणतात की, डेटिंग अॅप्सच्या वापरामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येत आहेत, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. ते या अॅप्सचा वापर बंद करू शकत नसतील तर सतत फोन वापरण्याची सवय सुटण्यासाठी तो वापरण्याची एक मर्यादित वेळ ठरवू शकतात.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
DVM Special : The Use of Dating Apps pulls In The Trap Of Loneliness