प्रत्येकजण म्हणतो... तो मी नव्हेच..!

प्रत्येकजण म्हणतो... तो मी नव्हेच..!

कराड/प्रतिनिधीः-

कराडमधील महसूल कर्मचार्‍यांचा बेबनाव सर्वदूर पोहोचला आहे. सर्कलांच्या प्रतापाचे कारनामे आम्ही जाहिर केले आणि प्रत्येकजण म्हणू लागले. तो मी नव्हेच...! हे ही खरे मानले तरी, कराड सर्कल व तलाठी यांच्यात कित्येकजण वर्षानुवर्षे कराडमध्येच तळ ठोकून आहेत. मग त्यांनी हा आव कशासाठी आणायचा. अधिकार्‍यांना चुकीची माहिती देवून जणू काही त्यांची लूट इतर लोके करतात. असे भासवायचे आणि आपण नामानिराळे रहायचे. आम्ही आवाज उठवला आणि त्यांच्या पायात ‘काटे’ रूतले. आता हे काटे कोणी काढायचे तर हे काम जिल्हाधिकार्‍यांनाच करावे लागेल. याचे पाप इतर अधिकारी घेणार नाहीत. कारण ते त्यांच्यात गुंतले आहेत. ज्यांनी हात मारला. तेच आता हात वर करत आहेत. तर काहीजण तर फाईलींवर राग काढत आहेत. तालुक्याचे कामकाज चांगले व्हावे. शासनाचा महसूल बुडू नये, ही माफक अपेक्षा कराड तालुक्यातील नागरिकांची आहे. ती पुर्ण करण्याचे काम रावसाहेबांना करावे लागेल. रावसाहेब राग काढण्यापेक्षा काम करा. तालुक्याची वाहवा तुमच्या पाठीशी उभी राहिल. कोरोनात जे काम झाले ते किती चांगले आणि किती वाईट यापेक्षा काम झाले याला महत्व आहे. जर तालुक्याची यंत्रणा सक्षम होती. तर जिल्हाधिकार्‍यांना कराडला हेलपाटे घालावे लागले नसते. कामातून आपले नाव कमवले तर बरे होईल. दुसर्‍यावर ठपका ठेवण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे तपासा. अन्यथा याचे ऑडिट जिल्हाधिकारी करतीलच...

कराड तालुक्यात गौण खनिजमध्ये अमाप पैसे मिळवणे हा उद्देशच काही महसूल कर्मचार्‍यांनी सुरू ठेवला आहे. मग त्या विटभट्टटया, माती उत्खनन, वाळू उपसा असो अथवा स्टोन क्रशर असो... याही पुढे जावून अनेक शेतकर्‍यांनी विहिरी खोदल्यानंतर त्यातून निघणारा माल हाच बेकायदेशीर आहे. असे सांगून त्या शेतकर्‍यांच्या खिशात हात घालण्याचे पापही या तलाठी सर्कलांनी केले आहे. वाळू नदीतील असो अथवा ओढ्यातील असो... ती आमच्या मालकीचीच आहे. शासनाला पैसे नाही भरले तरी चालतील. मात्र, आम्हाला ते द्यावे लागतील, अशी आपली जणू काही सातबारावर नोंद असलेल्या अविर्भाजात कराडात तळ ठोकून असलेल्या काही सर्कल तलाठ्यांनी राजरोस व्यवसाय सुरू केला आहे. एखादा वाळू ठेकेदार चौकशीला आला तरी त्याला कसे प्रस्ताव द्यायचे, ते मी येथून कसे मंजूर करीन आणि पुढचे तुमचे तुम्ही पहा असा सल्ला द्यायचा. हे काम हे कर्मचारी प्रामाणिकपणे करत असतात आणि त्यांना झालेल्या नोकरीची आठवण दिली तर मात्र तो मी नव्हेच या अविर्भावात मिरवतात. यापुढे असे होणार नाही. जिल्हाधिकारी याची नोंद घेणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार यात तिळमात्र शंका नाही.

कराडातील 30 टक्के तलाठी हे आपण याच तालुक्यात रहावे म्हणून प्रयत्नशील असतात. त्या तलाठ्यांचे प्रमोशन होते. ते प्रमोशन सुद्धा कराडतच करून घ्यायचे. आपणाला हवा तो सजा मिळावा म्हणून अधिकार्‍यांना चुकीची माहिती पुरवायची. प्रसंगी जे जे करावे लागेल ते ते करायचे. पण सजा आपणालाच मिळवायचा. सध्या कराडच्या तहसिल कार्यालयातून अनेक कारनामे पुढे येत आहेत. 5 ते 6 सर्कल दिवसभर या कार्यालयात घुटमळत असतात. त्यांची कामे संधी मिळताच करून घेतात. करणारेही ते कायदेशीर का बेकायदेशीर पाहत नाहीत. यांनी आणले आहे म्हंटल्यानंतर ते योग्यच आहे, असा शेरा मारून मोकळे होतात. राजरोसपणे सुरू असलेला हा महसूल बुडवीचा धंदा बंद झाला पाहिजे. जिल्हाधिकारी साहेब कोरोनातून जरा फुरसत मिळत असेल तर याकडेही आपण लक्ष घाला. जिल्ह्याच्या महसूलामध्ये यामध्ये वाढ होईल. हे निश्चित... आणि ज्यांनी येथे तळ ठोकला आहे. तेही जरा इतर तालुक्याची हवा खावून येतील. एक तलाठी सर्कल होवून दोन दोन तीन तीन सजाचे काम सांभाळतोय. यापेक्षा तो कराड तालुक्यातील सर्व गौण खनिजे सांभाळत आहे. परवानगी हवी असेल तर त्याला भेटावे लागते. त्याला भेटले तर काम झालेच. प्रांताधिकार्‍यांनी आज म्हणे काही सर्कल तलाठ्यांना वाळू उपशाचे गुन्हे दाखल करा... अन्यथा मी कारवाई करणार... असा सज्जड दम दिल्याचे समजते. आहो साहेब दम कसला देता... वाळू सापडत आहेना... मग वाळू वाल्याबरोबरच तेथील सर्कल तलाठ्यांवर गुन्हे दाखल करा... आपल्या मनाने तालुक्यातील बेकायदेशीर धंदे बंद होतील. आणि शासनाच्या महसूलात वाढ होईल. फेरफटका मारण्यासाठी तालुक्याची प्रमुख अधिकार्‍याला पाठवू नका... तुम्ही जा... म्हणजे तुमच्या सर्व काही लक्षात येईल... तुम्ही जर हे केले नाही तर जिल्हाधिकारी करतीलच... पाहूया पुढे काय घडते ते....

तो कोण

कराड तालुक्यात काम करणारा एक सर्कल सर्व परवानग्या देवू शकतो. मग ती गौण खनिजची असू द्या अथवा इतर कोणतीही. या सर्कलकडे दोन ठिकाणचा कारभार आहे. त्याच्या मनात येईल तो आकडा साहेबांच्या नावाखाली खपवण्याचा उद्योग याने सुरू केला आहे. याची कल्पना वरिष्ठांना आहे की नाही माहित नाही. पण त्याने काम हातात घेतले तर ते होतेच त्यामुळे यामध्ये काही तरी काळेबेरे असल्याचे दिसत आहे.

काटे’ कोणाच्या पायात रुतले

कराडात महसूल कर्मचार्‍यांच्यात सर्कल तलाठी हा महत्वाचा घटक आहे. या घटकाने मनात आणले तर तालुक्यात वाळूच काय आणि विट काय साधा दगडही उचलला जावू शकत नाही. पण हे घडणार कसे. प्रसार माध्यमाने लिहिले की त्यांना त्रास होतो आणि काटे त्यांच्या पायात रूततात. आता हे काटे कोण काढणार याला वैद्यकीय अधिकार्‍याची गरज नाही तर याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे आणि त्याचा बंदोबस्त करावा.