अवैध गौनखनिज उपशाचे पंचनामे झाले पुढे काय ?

महसूलमंत्री कराडला झाडाझडती घेणार 

अवैध गौनखनिज उपशाचे पंचनामे झाले पुढे काय ?

अवैध गौनखनिज उपशाचे पंचनामे झाले पुढे काय ?
 

महसूलमंत्री कराडला झाडाझडती घेणार  

अनिल कदम/उंब्रज

दै.प्रीतिसंगमने कराड तालुक्यातील अवैध मुरूम उपशाबाबत सलग १० दिवस 'महसुलचा गोलमाल' हि वृत्त मालिका सविस्तरपणे प्रसारित केली होती. यामुळे खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने कारवाईचा दिखावा उभा करून काही ठिकाणचे पंचनामे केले असल्याची कुजबुज आहे.परंतु याबाबत पुढे काय ! याची माहिती  उपलब्ध होऊ शकली नाही.यामुळे दिखाव्या पुरते मोजमाप व पंचनामा  करून पुन्हा 'क्लीन चिटचा'सिलसिला सुरूच असल्याची चर्चा तालुक्यात अजून धुमसत आहे.

तालुक्यातील काही ठिकाणचे मुरूम उत्खनन हे तोंडात बोटे घालायला लावणारे असल्याची चर्चा आहे.अनेकजण यामध्ये गब्बर झाले असल्याची चर्चा आहे.मात्र भरलेले आज पर्यत केलेले उत्खनन व भरलेले रॉयल्टीचे चलन हे नाममात्र असून वारेमाप उत्खनन होतेच कसे आणि महसूल यंत्रणा निमूटपणे हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत राहते कशी याकडे डोळेझाक करीत असल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

कराड उत्तर मधील 'त्या'गावातील मुरूम उत्खनन प्रकरण गंभीर असून महसूल यंत्रणा मात्र ठेकेदार धार्जिनी भूमिका घेत असल्याची 'त्या' गावातील लोकांची चर्चा आहे.जिल्हाधिकारी यांनी 'त्या' ठेकेदाराला २०१९ ला उत्खनन करण्यासाठी बंदी घातली आहे,प्रांताधिकारी यांचे पत्र सदरचे उत्खनन हे शासकीय नियमाला धरून नाही तसेच सदरचे उत्खनन बंद करावे असे आहे. तरी सदरचा ठेकेदार बिनदिक्कत पणे ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन चलन भरून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मुरूम उत्खनन करीत असेल तर त्या ठेकेदाराला कोणाचा वरदहस्त आहे याचा शोध जिल्हाधिकारी घेणार का याबाबत तालुक्यातील जनतेत चर्चा आहे.

काही जागरूक नागरिक 'त्या' प्रकरणाची पोलखोल करण्याच्या प्रयत्नात असले तरी सर्कल,तलाठी त्यांना काहीतरी बतावणी करून वेळ मारून नेत आहेत.तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी चिरीमिरीच्या नादात स्थळपाहणी अहवाल अतिशय चुकीचा दिला असल्याची चर्चा 'त्या' गावातील लोकांची असून अशी अनेक बोगस प्रकरणे कराड तालुक्यात घडली असल्याची शक्यता लोक बोलून दाखवत आहेत. सरळ मार्गाने माहिती मागितली असता ती मिळत नसून नागरिकांनी कायमच माहिती अधिकार कायद्याचा आधार घ्यायचा का ? अशी संतापजनक प्रतिक्रिया समाजात उमटत आहे.महसुलच्या सर्वच स्थानिक कारवायांची माहिती ही स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजे प्रत्येकवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे बोट दाखवणे चुकीचे असल्याचे मत नागरीक व्यक्त करीत आहेत.



कराड दक्षिण उत्तर मधील सर्वच गौण खनिज उत्खनने तपासा !

मिळालेली माहितीनुसार गत सहा महिन्यात कराड तालुक्यातील 39 ठिकाणी मुरूम उत्खनन झाले आहे आणि यासाठी परवानगी तहसील कार्यालयाने दिलेली आहे मात्र त्या ठिकाणची सध्य परिस्थिती काय आहे किती उपसा झाला आहे आणि रॉयल्टी किती भरली आहे याबाबतचा अहवाल शासन दप्तरी आहे का याबाबत शंका असून काही ठिकाणी सध्या वाढीव गौण खनिज रॉयल्टी भरली जात आहे ती आज पर्यत का भरली गेली नाही याची कारणे महसूल विभागाने शोधणे गरजेचे आहे.



महसूलमंत्री कराडला झाडाझडती घेणार का ?

गौण खनिज महसुलामध्ये सातारा जिल्हा राज्यात कायमच अग्रेसर राहिला आहे.आणि कराड तालुका तर जिल्हयात एक नंबरवर असतो मात्र गेल्या दीड वर्षात अवैध गौण खनिज उपशात चाललेला गैरकारभार व सावळागोंधळ महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या कानावर गेलाच असेल यामुळे कराडच्या दौऱ्यात बाबत झाडाझडती होणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे.