गर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी 

मानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतील. कारण मानवामध्ये निसर्गाबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतीची बळी ठरली, हीच मोठी खंत आहे.

गर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी 

गर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी 

कृष्णाकाठ / अशोक सुतार 
          मनुष्य जंगलात अतिक्रमण करत आहे. साहजिकच वन्यप्राण्यांचे वसतीस्थान असलेल्या भागात वन्यप्राणी फिरतात, परंतु मानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतील. कारण मानवामध्ये निसर्गाबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतेची बळी ठरली, हीच मोठी खंत आहे.
          केरळमध्ये जिल्ह्यात मल्लपुरम येथील स्थानिक गावकऱ्यांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस फळ खायला देऊन निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबद्दल नेक दिग्गज मंडळीनी खंत आणि निषेध नोंदवला आहे. आपण मानून म्हणून शिल्लक राहिलो आहोत का, अशी शंका आता मानवजातीबद्दल येऊ लागली आहे. आम्ही मानवता विसरून पशुत्वाकडे वाटचाल करत आहोत, असे दिसते. ज्या क्रूर पद्धतीने त्या हत्तीणीला संपवण्यात आले, ते पाहता हे निर्दयी कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे समोर आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. ही घटना घडली असतानाच अशीच अजून एक घटना समोर आली आहे.एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पथनपुरम जंगल क्षेत्रात एका हत्तीणीचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. जंगल क्षेत्रापासून काही अंतरावर हत्तीण गंभीर अवस्थेत आढळली होती. एका महिन्यापूर्वी एका तरुण हत्तीणीचा मृत्यू झाला होता. यावेळी तिच्या तोंडात जखमा झाल्याचे समोर आले होते. केरळमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असाव्या, असे दिसते. मानवाने जंगल क्षेत्रात अतिक्रमण केले असून जंगली प्राण्यांना नष्ट करणे सुरु केले आहे. मानवाच्या या क्रूरतेमुळे जंगलातील प्राण्यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती आहे. जैविक अधिवास नष्ट होणे हे तेथील पर्यावरणाला बाधीकारक असते. त्यामुळे अशा अमानवी कृत्यांबद्दल संबंधिताना गंभीर शिक्षा होणे गरजेचे आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मारेकरी सापडतीलाही, परंतु ही सैतानी वृत्ती थांबली पाहिजे, अन्यथा वन्यप्राणी अस्तित्वात राहणार नाहीत.                                                                             केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्यानंतर ते हत्तीणीच्या पोटात फुटले. हा स्फोट इतका मोठा होता की, हत्तीणीच्या जीभ आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कुणाला इजा केली नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली, अशी प्रतिक्रिया  मोहन कृष्णन  यांनी मल्याळम भाषेत आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडली आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिले असण्याची शक्यता मोहन कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. एका गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. भुकेने व्याकूळ असल्याने ही हत्तीण मानवी भागात अन्नाच्या शोधात आली होती. यावेळी तिला फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालण्यात आले. तीन दिवस ही असहाय्य हत्तीण पाण्यात मृत्यूची वाट पाहत उभी होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टवरून समजल्यानंतर जाग आली आणि घटनास्थळी पोहोचून त्या मृत हत्तीणीला इतर हत्तींच्या साहायाने बाहेर काढण्यात आले. वन अधिकाऱ्यांना संशय आहे की, हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले अन्न खाल्याचा संशय आहे. तिच्या तोंडात त्याचा स्फोट झाला. वन अधिकारी आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. अशा घटनांचा तपास करणे कठीण असल्याचे वन अधिकारी म्हणत आहेत. अशा घटनांमध्ये पुराव्याची माहिती गोळा करणे कठीण काम असून जंगली हत्ती एका दिवसात अनेक किमी प्रवास करत असल्याने त्यांनी नेमके कुठे खाल्ले असावे किंवा घटना कुठे घडली असावी, याचा अंदाज येत नाही. कळपातून बाहेर आलेले हत्ती जखमी किंवा आजारी अवस्थेत सापडल्यानंतर वन विभागाला याची माहिती मिळते. यादरम्यान अनेक आठवडे उलटलेले असल्याने तपास खूपच आव्हानात्मक असतो,असे  वन अधिकारी म्हणत आहेत. परंतु घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे.फटाके खायला देऊन हत्या करणे, ही आपल्या देशाची संस्कृती नाही. ही मानवी विकृती बंद केव्हा होणार ? प्राण्यांविषयी लोकांना अजूनही सहानुभूती नाही, हीच एक मोठी खंत आहे.                    केरळमध्ये हत्तीणीच्या झालेल्या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. घटनेची सखोल चौकशी करुन दोषींना ताब्यात घेतले जाईल व कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय वनमंत्री व  पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. तर, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल इंडियाने (HSI) या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला ५० हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. केरळमध्ये स्थानिक शेतकरी रानडुकरांपासून शेताचे संरक्षण व्हावे यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसाचा वापर करतात. हत्तीण अन्नाच्या शोधात जंगल सोडून जवळील गावात शिरली होती. याचदरम्यान हत्तीणीने हे फळ खाल्ले असण्याची शक्यता वन-अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन कृष्णन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिले असेल, असा अंदाज मोहन कृष्णन यांनी व्यक्त केला आहे. फळाचा स्फोट झाल्यानंतर, काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. मोहन क्रिश्नन यांच्या मते, जखमेवर माशा किंवा इतर किटक बसू नयेत यासाठी हत्तीणीने आपली सोंड पाण्यात बुडवली होती. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दोन जलदकृती टीम मागवल्या होत्या. मोहन याच टीमचे सदस्य होते. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणले, पण या हत्तीणीने बाहेर न येणे पसंत केले. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु मानवावरील भरवसा उडालेल्या हत्तीणीने आपले प्राण नदीत सोडले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ही हत्तीण गर्भवती होती, असे लक्षात आले. अलीकडच्या काही वर्षांत माणूस आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष सुरु आहे. परंतु याला नेमका संघर्ष म्हणता येणार नाही. कारण मनुष्य जंगलात अतिक्रमण करत आहे. साहजिकच वन्यप्राण्यांचे वसतीस्थान असलेल्या भागात वन्यप्राणी फिरतात, परंतु मानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतील. कारण मानवामध्ये निसर्गाबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतीची बळी ठरली, हीच मोठी खंत आहे.