कोरोनाची संख्या घटली आणि डॉक्टरांच्या ओपीडीचे दर वाढले 100 दिवस बंद असलेले दवाखाने पुन्हा सुरू झालेःसर्वसामान्य रूग्णांची होणारी लूट याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे

जर 100 दिवसांमध्ये एखाद्या रूग्णाला रूटीन चेकअपसाठी यावे लागत नसेल तर इतर वेळेला दर महिन्याला तपासणी ठेवून आजपर्यंत डॉक्टरांनी नेमके काय मिळवले. डॉक्टरांच्या दवाखान्यात तपासणीसाठी आल्यानंतर मग लॅब, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय यासारख्या महागड्या तपासण्या केल्यावर त्यातूनदेखील डॉक्टरांना बक्कळ प्रमाणात रेफरलचा फायदा होतो

कोरोनाची संख्या घटली आणि डॉक्टरांच्या ओपीडीचे दर वाढले 100 दिवस बंद असलेले दवाखाने पुन्हा सुरू झालेःसर्वसामान्य रूग्णांची होणारी लूट याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे

 

कोरोनाची संख्या घटली आणि डॉक्टरांच्या ओपीडीचे दर वाढले 100 दिवस बंद असलेले दवाखाने पुन्हा सुरू झालेःसर्वसामान्य रूग्णांची
होणारी लूट याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे


सातारा/प्रतिनिधीः-


सातारा जिल्हयात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा हाहाकार सुरू होता.दिवसागणिस संख्या वाढत होती. रूग्णांना बेड मिळत नव्हते. बेड अभावी व उपचारा अभावी अनेकांचे मृत्यु झाले. ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता.सामाजिक संस्था व कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी ऑक्सिजन मशिन घेतल्या. अचानक झालेल्या या वाढीने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि बाधितांचा आकडा कमी येवू लागला. थोडासा दिलासा मिळाला. अनेक हॉस्पिटलमध्ये सध्या बेड मोकळे पडले आहेत. अशातच सातार्‍यात जंबो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जेवढी येत आहे. त्यापेक्षा जास्त कोरोनामुक्त होत आहेत.ही दिलासादायक घटना असून असेच राहिले तर लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल.जरी एकीकडे ही परिस्थिती असली तरी दुसरीकडे अनेक बाधित होम आयसोलेशनचा पर्याय स्विकारून घरातच उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या
कोरोनाबाधितांव्यतिरिक्त इतर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. जेंव्हा रूग्णालयांची गरज होती. डॉक्टरांची आवश्यकता होती. तेंव्हा डॉक्टरांनी आपली रूग्णालये बंद ठेवून प्रॅक्टीस करणे थांबवले होते. कोरोनाची संख्या कमी झाली आणि पुन्हा डॉक्टरांच्या ओपीडी सुरू झाल्या. तीन महिन्याचा तोटा भरून काढण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या ओपडीच्या फीमध्ये मनमानी पद्धतीने जी आपल्याला वाटते ती रक्कम करून टाकली आहे. याची चौकशी जिल्हाधिकर्‍यांनी करणे गरजेचे आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही यासाठी ज्या पद्धतीने इतर दरावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा वापर केला तोच वापर याही ठिकाणी होणे गरजेचे आहे. 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनचे टप्पे वाढवण्यात आले. तब्बल 100 दिवस देश कुलूपबंद होता. कोरोनाची संख्या मुंबई, पुण्यामध्ये व मेट्रो शहरामध्ये वाढत होती. त्यावेळी ग्रामीण भागात पर्यायाने इतर जिल्ह्यात रूग्ण हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. जिल्हाप्रशासनही त्यावेळी सतर्क होते. अनेक बैठका घेत होते. सुचना दिल्या जात होत्या. आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. त्यांच्यावर सातत्याने प्रशासनाचा अंकुश होता. अशावेळी सर्वसामान्य रूग्णांच्यावर कोठेही उपचार होत नव्हते. सर्व रूग्णालये बंद होती. डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या होत्या. शहरात कोठेही सायरनचा आवाज ऐकायला मिळत नव्हता. इतर आजाराने मृत्यु झालेल्यांचेही प्रमाण कमी झाले होते. लॉकडाऊन थोडा थोडा शिथील होवू लागला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे करत आज अनलॉक सुरू झाला. लॉकडाऊनचे टप्पे कमी होत होते. मात्र, रूग्णालये बंदच होती. खाजगी डॉक्टर रूग्णांची तपासणी करत नव्हते. ज्यां रूग्णांना आवश्यकता आहे ते रूग्ण डॉक्टरांना फोन करत होते. डॉक्टर फोनवरूनच औषधे सांगत होती. अनलॉक सुरू झाले आणि दवाखाने सुरू झाले. हे दवाखाने कोरोनाची संख्या जसजशी कमी येवू लागली. तसतसे उघडू लागले. त्यांनी रूग्णालये खोलल्यानंतर प्रत्येक रूग्णालयात ओपीडीचे दर वाढले. हे दर का वाढले, कशासाठी वाढवले. याचे त्यांना काही देणे घेणे नाही. ज्या कालखंडामध्ये रूग्णांना गरज होती. त्या कालखंडामध्ये आपला स्टेटोस्कोप बाजूला काढून ठेवून घरात बसणारे डॉक्टर आज आपली झालेली तुट भरून काढत आहेत. ही एक लूटच आहे. या लूटीला
चॅलेंज नाही. कोठेही तक्रार करता येता नाही. अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांच्या समोर आहे.तब्बल सहा महिन्याच्या कालखंडात नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेकांच्या
नोकर्‍या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस आपले जीवन जगणारकसे, या विवंचनेत आहे आणि अशातच डॉक्टरांच्याकडून उपचार करून घेताना असे
जर प्रकार होत असतील, तर त्यांच्यावर अंकुश ठेवणार कोण. कोरोना वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत होती कराडसारख्या शहरामध्ये पुण्यातून डॉक्टरांनी येवून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. आणि कराडातील डॉक्टर मात्र गप्प होते. डॉक्टर हा देव आहे. तो सांगेल ते खरे, अशी समजणारी भोळीबाभडी जनता ज्या महामारीत तडपडून मरत होती. त्यावेळी हा देव देवळातच नव्हता. मग दर्शन घ्यायचे कोणाचे. जर 100 दिवसांमध्ये एखाद्या रूग्णाला रूटीन चेकअपसाठी यावे लागत नसेल तर इतर
वेळेला दर महिन्याला तपासणी ठेवून आजपर्यंत डॉक्टरांनी नेमके काय मिळवले. डॉक्टरांच्या दवाखान्यात तपासणीसाठी आल्यानंतर मग लॅब, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय यासारख्या महागड्या तपासण्या केल्यावर त्यातूनदेखील डॉक्टरांना बक्कळ प्रमाणात रेफरलचा फायदा होतो. ती बंद असलेली यंत्रणा पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. महामारीच्या काळात ज्यांची गरज होती. ते सर्वजण गप्प होते. जिल्हा प्रशासनाने आदेश काढून कोविड केअर सेंटरला काम करण्याचे दिवस ठरवून दिले होते. त्या आदेशाला या डॉक्टर
महाशयानी केराची टोपली दाखवली. प्रत्यक्ष ते कधीही याठिकाणी आले नाहीत. याची चौकशीही जिल्हाधिकर्‍यांनी करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे सिटीस्कॅन व कोविड टेस्टचे दर जिल्हा प्रशासनाने ठरवून दिले आहेत. त्याच पद्धतीने आता इतर आजारांचेही दर ठरवून द्यावेत व सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा. अशी मागणीही आता समोर येत आहे.