चोरे विभाग कोरोनाच्या दशहतीखाली,25 रुग्ण RAT टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह

गोर गरीब जनता कोरोनाच्या सावटाखाली

चोरे विभाग कोरोनाच्या दशहतीखाली,25 रुग्ण RAT टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह

उंब्रज/प्रतिनिधी

जवळपास चार महिने कोरोना महामारीला जवळपास न फिरकू देणाऱ्या चोरे विभागाचे गत आठ दिवसातील कोरोना बाधित रुग्णाचे आकडे चिंता वाढवणारे ठरले आहेत यामध्ये बुधवार दि 5 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली यांच्या मार्फत चोरे येथे राबवण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिरात 25 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याची माहिती इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुजाता माने यांनी दिली आहे.

चोरे परिसरातील एका कारखान्यात निदर्शनास आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नंतर या कारखान्यातील कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची संख्या जवळपास आठ च्या आसपास झाली होती यामुळे इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत अतिशय कमी मनुष्यबळ हाताशी असताना डॉ सुजाता माने यांनी चोरे परिसरातील लोकांच्या साठी कोरोना चाचणीचे रॅपिड अँटी टेस्ट(RAT)शिबीर आयोजित केले.यामध्ये चोरे परिसरातील 99 ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यातील चोरे येथील 21 जण तर धावरवाडी येथील 4 जण कोरोनाबधित असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डॉ सुजाता माने यांनी दिली.