45 वर्षीय कोविड-19 बाधीत महिला पूर्णपणे बरी आज सोडण्यात येणार घरी ; 39 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर 18 अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 45 वर्षीय कोविड-19 बाधीत महिलेचा 14 दिवसानंतरचा दुसरा नमुन्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.

45 वर्षीय कोविड-19 बाधीत महिला पूर्णपणे बरी आज सोडण्यात येणार घरी ; 39 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर 18 अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा /प्रतिनिधी: 

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 45 वर्षीय कोविड-19 बाधीत महिलेचा 14 दिवसानंतरचा दुसरा नमुन्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.    ही महिला कोविडी-19 या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे, असे जाहिर करुन तिला आज 8 एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. तसेच  सातारा जिल्ह्यात 6 एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या 32 अनुमानित रुग्णांचे व दि.7 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या 7 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालय सातारा येथे 1 ते 60 वर्ष वयोगटातील 18 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 1 ते 55 वयोगटातील पाच नागरिक (दोन पुरुष व तीन महिला) हे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे व 20 ते 60 वर्ष वयोगटातील 13 नागरिक कोविड-19 बाधीत रुग्णाचे निकट सहवासित आहेत. या सर्व रुग्णांचे घशातील स्त्रावाचा नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.