कुटुंबातील सदस्यांची दररोज ऑक्सिमीटरव्दारे तपासणी आवश्यक - आ. पृथ्वीराज चव्हाण

कुटुंबातील सदस्यांची दररोज ऑक्सिमीटरव्दारे तपासणी आवश्यक - आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड : मलकापूर नगरपरिषदेस रुग्णवाहिका सुपूर्द करताना आ. पृथ्वीराज चव्हाण


मलकापूरमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ : मलकापूर कोरोनामुक्त करण्याचा निश्चय - मनोहर शिंदे

कराड/प्रतिनिधी :

     नागरीकांनी दररोज सकाळी दैनंदिन उपक्रमानूसार पल्स ऑक्सिमीटरव्दारे आपल्या ऑक्सिजन लेवलची तपासणी करावी. यासाठी प्रत्येक कुटुंबाने पल्स ऑक्सिमीटर खरेदी करणे आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या प्रमाणानूसार व्यक्तीचे स्वाथ्य लक्षात येते. व पुढील औषधोपचार करुन नागरीकांचे स्वाथ्य सुधारण्यास मदत होते. सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत योग्य त्या सुचनांचे पालन करुन नागरीकांनी शासनासह कोवीड 19  मुक्त मलकापूर शहर बनवून राज्यात एक नवीन आदर्श निर्माण करण्यास सहकार्य करावे, असे मत आ. आमदार पृथ्वीराज चव्हाण व्यक्त केले.
           येथील मलकापूर नगरपरिषदेत रविवारी 20 रोजी सकाळी शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सभापती बांधकाम राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे,  उपसभापती कमल कुराडे नगरसेविका गितांजली पाटील, भारती पाटील, नंदा भोसले, अलका जगदाळे, पुजा चव्हाण,  स्वाती तुपे, शकुंतला शिंगण, नगरसेवक प्रशांत चांदे, सागर जाधव,किशोर येडगे, आनंदराव सुतार उपस्थित होते.
          आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोवीड 19 वर लस निर्माण करण्यासाठी सर्व देशातील शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्नरत आहेत. सध्या या विषाणूच्या समुहसंसर्ग सुरु झाला असून त्याचा हवेतून मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हा विषाणू हवेत दिर्घकाळ जीवंत राहत असल्याने मास्क न वापरणाऱ्या नागरीकांच्या श्वास नलिकेद्वारे फुफ्फुसात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन वाढत आहे. परिणामी फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होवून ते निकामी होते. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होवून रुग्णास मृत्युला सामोरे जावे लागत आहे. यापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे,मास्कचा वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रिचा नागरिकांनी कटाक्षाने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  
         परिक्षाविधीन मुख्याधिकारी श्रीमती आव्हाळे म्हणाल्या, मलकापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करुन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपरिषदेने  कोवीड 19 अंतर्गत नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका,  प्रभाग अध्यक्ष,  कोवीडदूत, नोडल अधिकारी, आरोग्य, आशा व अंगणवाडी सेविका, नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनासह कामाची माहिती देणे गरजेचे आहे. मलकापूर कोरोनामुक्त करण्यासाठी नगरपरिषदेच्या इतर नाविन्यपुर्ण योजनांप्रमाणेच मलकापूर पॅटर्न तयार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
          उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत मलकापूर शहर कोरोनामुक्त करण्याचा दृढ निश्चय करण्यात आला आहे. त्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर या त्रिसुर्त्रीचा वापर करण्यात येत असून सर्व नागरीकांनी नगरपरिषदेस सहकार्य करुन राज्यासह जिल्ह्यात मलकापूर पॅटर्नचा आदर्श निर्माण करूया. मलकापूर नगरपरिषदेस मुख्याधिकारी म्हणून लाभल्या भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे यांच्यासहाय्याने व लोकसहभागातून हे शक्य होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
         दरम्यान, मलकापूर नगरपरिषदेने कार्यक्षेत्रामध्ये नागरीकांच्या एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करुनदेण्याची मागणी केली होती. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रुग्णवाहिकेचा लोकार्पणसमारंभही यावेळी संपन्न झाला.   यामुळे रुग्णांना योग्य वेळेत सेवा पुरविणेत शक्य होणार आहे. तसेच मलकापूर शहरातील कोवीड बाधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणेसाठी मलकापूर नगरपरिषद कर्मचारी,  नगरसेवक, नगरसेविका, गजानन नागरी सहकारी पतसंस्था (मलकापूर), मे. मोटे इंडस्ट्रीज, संगम हॉटेल, कोयना वसाहत औद्योगिक इंडस्ट्रीज, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन काशिद, के. एस. टी. कन्स्ट्रक्शन व मलकापूर नगरपरिष यांच्यामार्फत एकूण 16ऑक्सिजन मशिन नगरपरिषदेकडे सुपुर्त करण्यात आल्या.  
         तत्पूर्वी, स्वच्छ सर्व्हेक्षण 2020  देशपातळीवर मलकापूर नगरपरिषदेने  25 वा, तर पश्चिम भारतात 11 वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. निलम येडगे व मुख्याधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे यांचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यादव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.