सातारा 17 ते 22 जुलै कडकडीत बंद, 23 ते 26 सौम्य शिथिलता

सातारा 17  ते 22 जुलै कडकडीत बंद, 23 ते 26 सौम्य शिथिलता

 

सातारा जिल्हा 17 जुलै ते 26 जुलै लॉकडाऊनबाबत जिल्ह्यात आदेश जारी, सर्वांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

सातारा / प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 17 जुलै पासून 26 जुलै पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशास जिल्हावासियांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहिर करण्याचे अधिकार यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील संबधित संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी इन्सीडंट कमांडर यांनी विस्तृतपणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले आहे. इन्सीडंट कमांडर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार नवीन प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश निर्गमित करावेत. 
प्रतिबंधित क्षेत्राबाबत क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 प्रमाणे यापूर्वी निर्गमित केलेले आदेश हे रद्द करेपर्यंत चालू राहतील. नवीन आदेश निर्गमित होईपर्यंत जुन्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. जर एखादया परिसरात नव्याने कोविड-19 चे बाधित रुग्ण आढळून आला तर त्या भागात देणेत आलेली सूट तात्काळ बंद करण्यात यावी.

*सातारा जिल्हा लॉकडाऊन करणेत येऊन पुढील बाबी संपूर्ण जिल्हयात प्रतिबंधित राहील.*

● सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दि. 17/07/2020 ते दि. 22/07/2020 पर्यंत संपुर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 22/07/2020 ते दि. 26/07/2020 या कालावधीत सकाळी 09.00 ते दु, 02.00 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.

● उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (शिवभोजन थाळी, वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स स्टाफ नर्स साठी यांचे निवासकामी असलेली हॉटेल, इन्स्टिटयुशनल कॉरंटाईन साठी घेतलेले हॉटेल व इतर इमारती वगळून) रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.

● वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मदयाची घरपोच सेवा दि. 17/07/2020 पासून ते दि. 22/07/2020 पर्यंत संपूर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 22/07/2020 ते दि. 26/07/2020 या कालावधीत फक्त घरपोच सुविधा चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.

● ZOMATO, SWIGY, DOMINOS व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हाॅटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा दि. 17/07/2020 पासून ते 22/07/2020 पर्यंत पुर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 22.07/2020 ते दि. 26/07/2020 या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील.

● सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morming Walk व Evening Walk करणेस प्रतिबंध राहील.

● सर्व केश कर्तनालय, सलुन/स्पा/ब्यूटी पार्लर दुकाने संपुर्णतः बंद राहतील.

● सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणे दि. 17/07/2020 ते दि. 22/07/2020 पर्यंत संपूर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 22/07/2020 ते दि. 26/07/2020 या कालावधीत केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार सकाळी 9.00 ते दु. 02.00 या कालावधीत चालू राहतील.

● मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दि. 17,07/2020 पासून ते दि. 2207/2020 पर्यंत संपूर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 22.07/2020 ले दि. 2607/2020 या कालावधीत सकाळी 09.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत चालू राहतील.

● शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः यंद राहतील,

● सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील, 

● सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांचेसाठी परवानगी राहील. तसेच अत्यावश्यक वस्तु यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतुक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.

● सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील.

● सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील.

● सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14/07/2020 पुर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील व मंगल कार्यालयातीन लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील

● सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील

● धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ / सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.

● E-COMMERCE सेवा उदा. AMAZON, FLIPKART व यासारख्या तत्सम सेवा दि. 1707/2020 पासून ते दि. 2207/2020 पर्यंत संपुर्णतः बंद राहतील. तद्नंतर दि. 22.07/2020 ते दि. 26072020 या कालावधीत सकाळी 09.00 ते दु, 02.00 वाजेपर्यत चालू राहतील.


*सातारा जिल्ह्यात खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.*

● दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. 06.00 ते. 10.00 या कालावधीत सुरु राहील.

● सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापना पशुचिचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. कोणतही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. 

● सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9.00 ते दु, 2.00 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहील.

● पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी. 9.00 ते सायं 6.00 या वेळेत सुरु राहतील. शासकीय वाहने, वैदयकीय सुविधा पुरवणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहन, कृषी व्यवसायाशी निगडीन सर्व यंत्र व वाहने, कार्यरत असलेले उद्योग व औद्योगिक आस्थापनेशी संबंधित वाहने, सर्व प्रकाशी माल वाहतूक वाहने, वृत्तपत्र व्यवसायाशी संंबंधिन वाहने व शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली वाहने यांना इंधनपुरवठा करावा.

● एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील.

● पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील.

● निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.

● औदयोगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.

● शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील.

● कृषी सेवा केंद्र/बि-बियाणे/खते/किटकनाशक दुकाने/चारा दुकाने ही सर्व दुकाने सकाळी 9.00 ते दु, 2.00 या कालावधीत चालू राहतील, शेतमालाची कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग सुरु राहतील. सर्व प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी राहील. 

● दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 6.00 ते 9.00 या वेळेमध्ये सुरु राहील.

● सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गांव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय किमान मनुष्यबळासह सकाळी 9.00 ते दु, 2.00 या कालावधीत सुरु राहतील. बँकांच्या इतर ग्राहकसेवा (उदा ऑनलाईन, एटीएम इत्यादी सारख्या) सुरु राहतील.

● औषध व अन्न उत्पादन सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादारी नियमानुसार चालू राहतील व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरुन देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येईल.

● एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औदयोगिक आस्थापना चालू राहतील. तसेच या आस्थापनांसाठी जाण्यासाठी आणि परतीसाठी दोन चाकी व चार चाकी वाहन किंवा जिल्हयाबाहेरील कर्मचा-यांसाठी निश्चित केलेल्या बसमधूनचे प्रवासाला परवानगी राहील. (दोन चाकी वाहनांस एक व्यक्ती, चार चाकी वाहनांमध्ये 3 व्यक्ती व बसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंत परवानगी राहील) तथापि त्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यापूर्वी बाहेरील जिल्हयातील कर्मचारी यांची औदयोगिक आस्थापनेसाठी वाहतूक करणेबाबत चालू असलेली वाहन व्यवस्था चालू राहील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तींनाच कामावर उपस्थित राहता येईल.

● माहिती तंत्रज्ञान उदयोग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील. शक्य असल्यास WORK FROM HOME चा

● संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटरकरीता ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयांच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.

● वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.

● सर्व मा, न्यायालये व राज्य शासनाचे/केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील, शक्य असल्यास WORK FROM HOME चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.


*आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई*
या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी असे आदेशात नमुद आहे.