टेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात

"महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली परिसरात अनधिकृत बांधकामाला उधाण " 'स्थानिक प्रशासन मात्र गंधारीच्या भूमिकेत'

टेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात
टेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात

टेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात


महाबळेश्वर/संजय चोरगे

"महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली परिसरात अनधिकृत बांधकामाला उधाण " 'स्थानिक प्रशासन मात्र गंधारीच्या भूमिकेत' 

पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मौजे टेकवली या ठिकाणी पुणे येथील धनिक श्री सुनील शिवणानी यांनी सर्व्हे क्र.6/1/क  मध्ये साधारणतः6 गुंठे भू-खंड खरेदी करून सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता राजरोसपणे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. चालू बांधकाम पाहता महाबळेश्वर तालुक्यामध्ये खरोखरच बांधकामविषयीचे नियम कठोर आहेत का ? निसर्गाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या  अटीशर्ती ह्या खरोखरच अस्तित्वात आहेत का फक्त कागदी घोड्यावरच नाचतात❓असा यक्ष प्रश्न संबंधित ठिकाणचे बांधकाम पाहताना उपस्थित राहिल्या शिवाय राहत नाही. 

संबंधित ठिकाण हे महाबळेश्वर शहराच्या पूर्वेला अवघ्या 9 किमी. अंतरावरती असल्याने सरकारी व गावकारभरी यंत्रणेच्या पूर्णपने निदर्शनाखाली आहे त्या मुळे कोणतीही गोष्ट लपून चालली आहे याचा विषयच येत नाही तरी देखील सदर बेकायदा बांधकामा विरोधात काही स्थानिक पर्यावरणी प्रेमींनी केलेल्या तोंडी तक्रारीची दखल घेत गांधारीच्या भूमिकेत असलेल्या स्थानिक प्रशासनाने तलाठी कार्यालय मौजे मचुतर मार्फत खालील आशयाची कायदेशीर नोटीस सदर धनिकाला बजावण्यात आली...........परंतु सदरच्या सरकारी आदेशाचे कोणतेही गांभीर्य न घेता धनिकाने सदरच्या नोटिशीला अक्षरशः केराची टोपली दाखवीत बे कायदेशीर बांधकामाला पूर्णत्वास नेण्याचा जणू चंगच बांधल्याचे आज अखेर बेदरकपणे सुरू असलेल्या बांधकामकडे पाहताना स्पष्ट पणे निदर्शनास येत आहे. सध्य स्तिथीकडे पाहताना भविष्य काळा मध्ये एक होते महाबळेश्वर असे म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.