पुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर ट्रेकर्स कडून सुरू

पुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर ट्रेकर्स कडून सुरू

पुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर ट्रेकर्स कडून सुरू "


 महाबळेश्वर प्रतिनिधी / संजय चोरगे


 दि.१६.०१.२०२१ पासून बेपत्ता असलेल्या पुणे ( रावेत ) येथील रोमित पाटील ह्या इसमाची स्विफ्ट कार क्र.एम एच १४ बी एक्स ७८०० ही महाबळेश्वर पासून ३ किमी अंतरावरती प्रतापगड कडे जाणाऱ्या घाट मार्गावरील नागमोडी वळणावर गेल्या २ ते ३ दिवसांपासून बेवारस अवस्थेत उभी असलेली आढळून आल्याने संबंधित बेपत्ता व्यक्तीचा शोध हा महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीम मार्फत आज सकाळ पासून सुरू झाला आहे परंतु संबंधित ठिकाण हे अवघड दऱ्या - खोऱ्या व दाट जंगलाने वेढलेले असल्याने शोध कार्यात अनेक अडथळे येत आहेत परंतु अश्या अवघड परिस्थिती मध्ये देखील महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान श्री.कुमार भाऊ शिंदे, श्री.अनिल केळगणे व श्री.सुनील बाबा भाटिया हे आपल्या इतर सहकाऱ्यांसह मोठ्या जिकरीने शोध कार्य करीत आहेत.