कमी पगाराचा मानकरी

कमी पगाराचा मानकरी

कमी पगाराचा मानकरी

अरे तो बघ पोलिसवाला चौकात थांबला आहे आज पैसे घेऊन जाणार वाटते असे कितीतरी लोक म्हणतात. पोलिसवाला चौकात दिसला की तो फक्त पैसे खाण्यासाठी थांबला असणार असे विचार करणारे  बरेच लोक आहेत.ज्या लोकांचे म्हणणे असते की पोलीस फक्त पैसे खातात ते आज घरात बसून पोलिसांना किती पैसे देत आहेत? ते जाऊ द्या कमीत कमी घरी बसून बातम्या तर पाहतच असतील की, पोलिसांचा पगार 30 % कमी झाला आहे मग त्यांनी सरकारला विचारायला पाहिजे की ,भारत देश आज कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकला आहे.तरीदेखील स्वतः च्या जिवाचा विचार न करता नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तहान-भूक,कुटुंब,घरदार सर्व विसरून  पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

खरं तर जागरूक नागरिकांनी पुढे येऊन बोलले पाहिजे की,पोलिसांना या काळात तरी पगार जास्त द्यायला पाहिजे कारण तसाही पोलिसांचा पगार कमीच आहे. ’सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणारा व्यक्ती म्हणजे पोलीस तसेच डॉक्टर, मेडिकल स्टाफ आणि सफाई कामगार यांच्या कामाला मनापासून सलाम.......!

पोलिस हा रात्रंदिवस रस्त्यावर उभा राहून काम करतोय त्यालाही घरदार कुटुंब आहे. आपण देव हा फक्त देवळात पाहिला आहे पण  खरा देव हा  रस्त्यावर आणि हॉस्पिटलमध्ये आपले कर्तव्य पार पाडताना पहात आहोत. मरणाच्या भीतीने आज सामान्य माणूस घरात बसला आहे.हे तेच लोक आहेत जे म्हणायचे की पोलीस पैसे खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत.पोलिसांना पैसे पाहिजे, आम्हाला पोलिसांची भीती वाटते, ते सामान्य लोकांना मारतात पण मी आज पोलीस पत्नी धनश्री वागरे  विचारते की,तुम्ही आतापर्यंत अशा एकाही पोलिसाला पाहिलेे नाही की ज्याने खरच पैसे न घेता तुमची मदत  नाही?

कोणी चांगलं म्हटल्यावर पोलीस चांगला ठरत नाही आणि कोणी वाईट म्हटल्यावर वाईट ठरत नाहीत पोलीस हा समाजाचा एक भाग आहे.जसा आपला समाज तशीच पोलीस यंत्रणा असणार आहे.पोलीस तर त्यांनी जी शपथ घेतली  त्याचे तंतोतंत पालन करत ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. आता कुठे आहेत ती लोक जी म्हणतात की पोलीस पैसे  खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत.आज प्रत्येक पोलिस  रस्त्यावर उभा आहे कोणता पोलिसवाला आहे जो तुम्हाला म्हणतो की,आमचा पगार कमी झाला आहे त्यामुळे मला पैसे दे, आज मी माझं घरदार कुटुंब लहान मुलं यांना सोडून तुमच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर उन्हाचे चटके खात उभा आहे. कोरोनामुळे जे लोक आता घरात बसून आहेत त्यांना आपल्याला कोरोनाची लागन होईल अशी भीती वाटते ते लोक किती पोलिसांची मदत करायला जात आहेत बोलले खूप सोपे असते ते अंमलात आणणे अवघड असते.

काही बहादूर आहेत की, पोलिसांचा पगार कमी का असे विचारल्यावर म्हणतात त्यांना वरची कमाई आहे ना, त्यामुळे त्यांना जास्त पगाराची  गरजच काय?  मी पोलीस पत्नी विचारते की तुम्ही लोक पोलिसांना किती पैसे नेऊन देता की,आमचे काम केले घ्या पैसे........ सगळेच पोलीस भ्रष्ट आहेत असे सगळेच म्हणतात असे मी  म्हणत नाही.पण जे असे म्हणतात ते पोलिसांना किती पैसे देतात आणि का देतात? आज आपल्या देशावर कोरोनाचे किती मोठे संकट आले आहे कोण कोण बाहेर उन्हात उभा असलेल्या पोलिसांना जेवण,नाश्ता विचारत आहे.
पोलिसांचा पगार कमी झालाय याबाबत कोणी आवाज उठवला आहे का? जो तो आपल्या जिवाचा विचार करून घरात  बसला आहे. व्हाट्सअप,फेसबुक इतर सोशल साइटवर आपण व्हिडीओ पाहत आहोत की आज पोलीस पण रस्त्यावरील आणि गरीब लोकांना जेवण,नाष्टा-पाणी देत आहेत. सरकारला पण कळायला पाहिजे की पोलिस रात्रंदिवस एक करून आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य करत आहे त्यांना पगार कमी का द्यावा? बँका तसेच इतर शासकीय कार्यालयात पाच टक्के कर्मचारी काम करण्याचा आदेश दिला आहे ना तर मग त्यांची संख्या वाढवा त्यांना पण कामाला लावा बँकेमध्ये कर्मचारी जास्त नको,बँकेमध्ये गर्दी नको मग पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून 30 टक्के कमी पगार घेऊन काम का करावे? ज्या लोकांना जास्त पगार आहेत त्यांचे पगार थोडे दिवस थांबवावे आणि पोलिसांना पूर्ण पगार द्यावा अशी विनंती करते. पोलीस वाले चौकात उभे राहिले की फक्त पैशासाठी उभे राहिले असे म्हणतात. ’पोलीस’ हा शब्द ऐकला की काही लोकांना पैसे लुटण्याची मशीन असं वाटते. मी इथे सर्वांनाच दोष देत नाही कारण काही चांगले नागरिक पण आहे जे पोलिसांना खरच मान देतात.
पोलीस दिवसभर ड्युटी करून घरी येतात तेव्हा घरात लहान मुलं आणि वडीलधारी मंडळी असतात त्यांना  कोरोनाची लागण  होईल याचा विचार पोलिसांच्या मनात येत असतील की नाही ? पण पोलिसांच्या मनाचा कोण विचार करणार! पोलिसांचा 30 टक्के पगार कमी झालाय.पदानुसार जर पगार झाला तर किती टक्के पगार मिळाला असणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस शिपायांना आठ तास ड्युटी केली आहेत आणि पोलिस अधिकार्‍यांना नो टाईम लिमिट आहे,पोलिस अधिकार्‍याने आठ तासाच्या वरती जर कामे केली तर त्याला ओव्हरटाईम वेतन द्यायला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.

खरा घडलेला एक किस्सा आहे, मुंबईतीमधील भायखळा भागात एक मध्यम वयाची महिला रस्त्यावर बराच वेळ थांबून  टॅक्सी ची वाट पाहत होती.पण तिला एकही टॅक्सी मिळाली नाही म्हणून ती जवळच्या पोलिस चौकीत गेली.तेथील पोलिसांना टॅक्सी करून द्या म्हणून बडबड करत होती,”मुझे टॅक्सी कर के दो, पुलीस क्या सिर्फ पैसे खाने के लिये है क्या?आता ती महिला असल्यामुळे तिला कोणी पोलिसांनी काही प्रत्युत्तर दिले नाही.पण एका पोलीसऑफिसर ने तिला विचारले की तुम्ही आतापर्यंत किती वेळा पोलिसांची मदत मागितली आहे किंवा आज पर्यंत किती पोलीस वाल्यांना पैसे दिलेत हे आधी सांगा ? तिच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते,कारण तिने कधीच कोणत्याही पोलिसाला पैसे दिले नव्हते,फक्त ऐकीव माहिती वरून तिने तिचे मत बनवले होते.नंतर तिला त्याच पोलीस अधिकार्‍याने टॅक्सी करून दिली,तर अशी ही आपली जनता...

देशातली जनता जर रस्त्यावर,गल्लीबोळात फिरत राहिली तर लोकडाऊन ची 3 मे ही तारीख 3 जून आणि नंतर अशीच वाढत जाईल. मग काय सर्व जण घरात बसून फक्त पोलिसांना रस्त्यावर उभे करतील जे पाच टक्के लोक कामासाठी ठेवले त्यांना पण घरी बसून  पोलिसांना पगार न देता त्यांच्याकडून काम करून घेतील. बिन पगारी जरी पोलिसांनी काम केले तरी काही नालायक जनता आहे त्यांना काय झालं काम न करायला असे म्हणतात.सरकारने पण पोलीसांचा विचार करायला हवा, पोलिसांचा पगार वाढवायला पाहिजे. पोलीस पैसे खातात हे मत सिनेमा पाहून बनते असे माझे म्हणणे आहे.कारण तसे सिनेमा मध्ये दाखविले जाते,सरकारने चुकीचे संदेश देणार्‍या सिनेमावर बंदी घातली पाहिजे.आपण स्वतःला नियमानुसार वागण्याची सवय लावून घेतली,कायद्याचे ज्ञान ठेवले आणि त्याचे उल्लंघन केले नाही,तर कोणालाही लाच देण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही.जर आपणच हेल्मेट न घालता बाईक चालवत असू आणि 500 रुपये दंड लागू नये म्हणून पोलिसाला 200 रुपये ऑफर करत असू तर भ्रष्टाचार कसा कमी होईल?
पोलिसांना पगार का कमी दिला जातो किंवा दिला आहे ? याची बातमी आतापर्यंत एकाही प्रसारमाध्यमांनी दाखवलेली नाही किंवा पोलिसांचे तसे त्यांच्या कुटुंबीयांचे काय मत आहे हे पण दाखवले नाही.मी आहे कमी पगाराचा मानकरी तरी मी आहे त्यात समाधानी नाही घरदार कुटुंब मुले यांचा विचार कर्तव्य पार पाडण्यात मी आहे तत्पर उन्हाचे चटके खात आहे मी रस्त्यावर उभा माझ्याही मनाचा विचार करणार का थोडा ?कोरोनाच्या या युद्धात द्याल का साथ त्यामुळे आपले जीवन होईल निरोगी

धनश्री सुगावकर- वागरे,
(मुंबई) (सहा पोलीस निरीक्षक पत्नी) 9096004597