महाविकास आघाडीचे जनक

महाविकास आघाडीचे जनक

 

महाविकास आघाडीचे जनक


2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून 105 जागांसह सत्तेचा दावेदार होता. सुमारे 3 महिने सत्तास्थापनेचे गुराळ सुरू होते.सत्ता कोणाची होणार याकडे राज्याच्या नजरा होत्या. अखेर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांचे सरकार सत्तेवर येवून राज्यात तिन पक्षाचे मिळून सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन करण्याचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत..!

युतीच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती. पण शिवसेनेला फारशी किंमत नव्हती. महायुतीच्या कालखंडात शिवसेनेकडे जी खाती देण्यात आली होती. त्या खात्याचा वापरही भाजपाच करत होते. यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी होती. 2019 चे निकाल जाहिर होत होते आणि पुन्हा युतीची सत्ता महाराष्ट्रात येणार याचे संकेत मिळत चालले होते. अशातच सर्वात कमी जागा असलेला राज्यातील काँगे्रस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्‍यात एक धक्कादायक विधान केले आणि त्यांनी एका टेलिव्हीजनच्या मुलाखतीत निकाल लागण्यापुर्वीच महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा धक्का दिला. यामागचे गणित काय यावर सुमारे दोन महिने कात्याकुट झाला. पण अखेर ही विधान त्यांचे खरे ठरले. दिवाळीच्या फराळाचे निमित्त झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असे विधान केले, हे विधान सोशल मिडियावर प्रसारीत झाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी जाहिररित्या मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगितला. हा दावा सांगत असताना चर्चा होणार आणि युतीचा मुख्यमंत्री म्हणून अडीच-अडीच वर्ष भाजप शिवसेनेच्या वाट्याला येणार.

 

कारण भाजपाला सत्ता बनवायची असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. हे दिसत होते. आणि तशा चर्चा युतीच्या नेत्यांमध्ये सुरू होत्या. एकीकडे या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे शरदपवार यांनी शिवसेनेला बरोबर घेवून सरकार बनवण्याची रणनिती सुरू ठेवली होती. आमदार फुटू नयेत याची काळजी प्रत्येक पक्ष घेत होता. पक्षाने आप-आपले आमदार एकत्रित करून ठेवले होते. याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राज्यात भाजपाचे सरकार येता कामा नये, हे पक्षश्रेष्ठीला पटवून देत होते. दिवसभर आमदारांच्याबरोबर तर दिल्लीत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर बैठका करत होते. अखेर ठरले आणि मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी स्विकारली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार हे ठरल्यानंतर भाजपाने राजकीय डावपेच आखले आणि आवाजी मतदानात विधानसभेचा अध्यक्ष नियुक्त करावा अशी मागणी केली. ही मागणी न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर काय होणार, याकडे सर्वजण लक्ष ठेवून होते. मुंबईत सर्व आमदारांची बैठक सुरू होती. मात्र, दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण कायदेशीर लढा देत होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींचे मन वळवले. तर दुसरीकडे न्यायालयीन लढाही जिंकला आणि विधानसभेचा अध्यक्ष हा बहुमतानेच होणार हे ठरले. यामुळेच राज्याची सत्तामहाविकास आघाडीेकडे आली. जर न्यायालयामध्ये बाजू मांडण्यामध्ये अयशस्वी ठरले असते तर राज्याची सत्ता भाजपाकडेच राहिली असती. 

 

पण एकीकडे शरद पवारांचा अनुभव अन् दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांची विद्वत्ता या जोरावरच राज्यात ही सत्ता बनली. या सत्तेला जरी आज वर्ष पुर्ण होत असले तरी या सत्तेचे खरे जनक आहेत. ते म्हणजे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतही सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे ठासून सांगत होते आणि महाराष्ट्र काही दिवस त्याकडे गांभीर्याने पहात नव्हता. अखेर त्यांचे हे विधान खरे ठरले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात या महाविकास आघाडीचे सरकार आले. वर्षपुर्ती करत आहे. या वर्षपुर्तीच्या निमित्ताने अनेक गोष्टींचा उहापोह होणे गरजेचे आहे. जर पवारसाहेब आणि पृथ्वीराज चव्हाण नसते तर कदाचित राज्यात ही सत्ता बनली
नसती. 

आज महाराष्ट्रात हे सरकार काम करत असताना ज्याप्रकारे सरकारवर विरोधीपक्ष जी टिका करत आहे, ती काहीवेळा मर्यादा सोडूनही होत आहे. कोणत्याही क्षणी हे सरकार पडेल आणि आपली सत्ता येईल, याचे गाजर सातत्याने कार्यकर्त्यांना दाखवले जात आहे. हे दाखवत असताना तीन्ही पक्षातील नेते आपल्यापासून दुर जात आहेत. याचा विचार विरोधी पक्षातील नेत्यांनी करणे गरजेचे आहे. राजकारणासाठी वैयक्तिक संबंधही ताणले जात आहेत. आज राज्यात गेल्या आठ महिन्यापासून कोरोना महामारीला रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. एखादी महामारी आली तर सर्वांनी त्याला तोंड देणे गरजेचे आहे. जसे नागरिक तोंड देतात, त्याचपद्धतीने सर्व सत्ताधारी विरोधकांनी एकत्रित येवून या महामारीतून आपले राज्य कसे बाहेर पडेल, हे पाहणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने यातही राजकारणच केले जात आहे.वर्षपुर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी काही टिकास्त्र केले आहे. पण त्याचा समाचार विरोधी पक्ष त्याच पद्धतीने घेत आहे. 

राज्याचा गाडा हाकताना चांगले-वाईट घडणार म्हणून एखाद्याला बदनाम करणे उचित नाही. हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात कोरोना, कोकण किनार पट्टीवर वादळामुळे झालेले नुकसान आणि मराठवाड्यात पावसाने झालेले नुकसान यातून सरकार सातत्याने बिकट वाट पार करत आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही. तोपर्यंत कोरोना गेला असे म्हणून चालणार नाही. देशात या महामारीचे थैमान अद्यापही सुरूच आहे. यातून आपणही सुटलेलो नाही. काळजी घेवून काम केले पाहिजे. सरकारला काही बाबतीत सहकार्य करणे गरजेचे आहे. हे जसे राज्यातील जनतेचे कर्तव्य आहे तसेच विरोधी पक्षाचे आहे. राजकारणासाठी निवडणुका हे माध्यम आहे.त्यावेळी त्याचा वापर व्हावा, इतरवेळी राज्य पुढे  नेण्यासाठी प्रयत्न करावा. सरकारने आपली वर्षपुर्ती केली आहे. भविष्यात त्यांच्या हातूनही राज्य पुढे नेण्याचे काम व्हावे.