माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यासह कराड दक्षिण मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. उंडाळे येथे दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.

माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर
यांचे निधन 

कराड/प्रतिनिधी : 
          राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे पावणे पाच वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यासह कराड दक्षिण मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. आपला लाडका नेता हरपल्याने दक्षिणेतील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावुक झाले आहेत. 
          मागील काही दिवसांपासून विलासकाका पाटील-उंडाळकर यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच सोमवारी 4 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेससह सातारा जिल्हा व कराड दक्षिणवर शोककळा पसरली आहे. 
          स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे पार्थिव आज सातारा येथील निवासस्थानातून कराडकडे निघणार आहे. येथील कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे त्यांचे पार्थिव सकाळी 10.30 वाजता अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर सुमारे 12.30  कराड येथून त्यांच्या गावी उंडाळे ता. कराड येथे रवाना होणार आहे. दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिव उंडाळे येथील त्यांच्या निवसस्थानी अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 3 वाजता अंत्यविधी होणार आहे.