मलकापूरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेला गती - मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे

राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत कोविड बाधित रुग्ण व त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रेक अँण्ड ट्रिट या त्रिसुत्राचा वापर करुन रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. गृह भेटीद्वारे तपासणी व उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. याद्वारे अति जोखमीच्या (को-मॉर्बीड) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड 19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येणार असून या गृहभेटी दरम्यान सारीचीही  (आयएलआय) तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

मलकापूरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेला गती - मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे

गृह भेटीद्वारे आरोग्य तपासणी : ट्रेस, ट्रेक अँण्ड ट्रिट त्रिसुत्राचा वापर, सारी’चीही होणार तपासणी 

कराड/प्रतिनिधी :
          राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत कोविड बाधित रुग्ण व त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रेक अँण्ड ट्रिट या त्रिसुत्राचा वापर करुन रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. गृह भेटीद्वारे तपासणी व उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. याद्वारे अति जोखमीच्या (को-मॉर्बीड) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड 19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येणार असून या गृहभेटी दरम्यान सारीचीही  (आयएलआय) तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 
          या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाने सदर मोहिमेचा पहिला टप्पा 10 ऑक्टोंबर असा देण्यात आला आहे. मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण 8 हजार 437 गृहभेटी करायच्या असून या कामासाठी एकूण 26 पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये एक आशा सेविका व दोन स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला यावर नियंत्रण ठेवणेसाठी 9 नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यत आली आहे. हे आरोग्य पथक शहरातील प्रभागामध्ये गृहभेटी देणार असून यावेळी घरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करणार येणार आहे.
          त्यामध्ये विशेषत: मधुमेह, ह्रदयविकार, किडणी, लठ्ठपणा, कॅन्सर, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींचा  शोध घेऊन त्यांना कोविड प्रतिबंध संदेश देण्यात येणार आहे. तसेच गृहभेटी दरम्यान ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून येतील, त्यांना त्याच दिवशी तपासणीसाठी पाठविणेत येणार आहे. त्यामध्येही लक्षणे आढळल्यास  त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाणार आहे. यामुळे शहरातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार असून संभाव्य घटना टाळण्यास मदत होणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
          माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून शहरात तपासणी दरम्यान प्रभाग निहाय स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी एका आशा सेविके पाठीमागे दोन स्वयंसेवक असणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपरिषदेने स्वयंसेवकांशी संपर्क साधून त्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही प्रभागात या मोहिमेमध्ये स्वयंसेवक सहभागी झाले असून मोहिमेस अपेक्षित गती मिळण्यास मदत होणार आहे. अजूनही ज्या स्वयंसेवकांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संबंधित प्रभागातील नोडल अधिकाऱ्यांशी  संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या वतीने केले आहे.
         तसेच गृहभेटी दरम्यान भेट देणाऱ्या आशा सेविका, स्वयंसेवक व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सर्वांनी सविस्तर, बिनचुक माहिती देऊन मलकापूर शहर कोविड मुक्त करण्यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. असे आवाहनही शहरातील सर्व कुटूंबांना मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.