कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून पूरपरिस्थीतीची पाहणी

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून पूरपरिस्थीतीची पाहणी

 

 

कराड / प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करून कराड येथील पूरपरिस्थीतीची पाहणी केली व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यास रवाना झाले.                                                                            यावेळी आमदार आनंदराव पाटील, सातारा जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे, अशोकराव पाटील, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र (आप्पा) माने, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, सातारा जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण, उद्योजक उदय थोरात, युवा नेते प्रतापसिंह पाटील, पाटण तालुका युवक काँगेस अध्यक्ष गिरीश पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस चे सचिव धैर्यशिल सुपलेप्रशांत देशमुखसुधीर शिंदे, प्रसाद रैनाक, अनिल पाटील, मारुती जाधव व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.