पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यातर्फे वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यातर्फे वृक्षारोपण
कराड : वृक्षारोपन करताना पै. धनंजय पाटील, तानाजी देशमुख, धनाजी माने, सुनिल शिंदे व इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यातर्फे वृक्षारोपण

विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन

कराड/प्रतिनिधी : 
          देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी १४ ते शुक्रवारी २५ सप्टेबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून तालुक्यातील शेरे, संजयनगर, गोंदी गावठाण, जुळेवाडी, मलकापुर, काले, रेठरे बुद्रुक, येणके, कोळे, येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 
         यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, मलकापुर युवा मोर्चा शहराध्यक्ष तानाजी देशमुख, धनाजी माने खुबीकर, किसान मोर्चा उपजिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, गोंदीचे उपसरपंच किशोर पवार, डी. एस. सोमदे, सुनिल शिंगाडे, यांच्यासह सरपंच, उपसरपच, ग्रा. पं. सदस्य व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

* सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतीसंगम*