प्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार सुपारी  मल्लप्पा चा खुण झाल्यावर केली जेल ची वारी

मारले दुधनी तांड्यात आणि प्रेत आणून टाकले सांगवी नदी पात्रात

प्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार सुपारी  मल्लप्पा चा खुण झाल्यावर केली जेल ची वारी

प्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार सुपारी  मल्लप्पा चा खुण झाल्यावर केली जेल ची वारी

मारले दुधनी तांड्यात आणि प्रेत आणून टाकले सांगवी नदी पात्रात

अक्कलकोट/ महेश गायकवाड

प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे मल्लप्पा सुनगार  चा काटा काढण्याचे त्याची पत्नी लक्ष्मी (वय 30) हिने ठरविले, आणि प्रियकर गुटल्या(उर्फ) सैफन बोबडे याला   सांगून टाकले की सुपारी देऊन खलास कर
 हिरोळी च्या मल्लप्पा सुनगार याचे पोत्यात बांधलेले प्रेत सांगवी नदीच्या पात्रात आढळून आले होते यानंतर मोठी खळबळ सांगवी परिसरात आणि अक्कलकोट तालुक्यात उडाली होती,
यानंतर अक्कलकोट च्या उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शिताफीने तपासाची चक्रे हलवीत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार जणांना तात्काळ अटक केली होती, हे सर्व आरोपी लक्ष्मी चा प्रियकर सैफन उर्फ गटल्या बोबडे याने आपल्या ला सुपारी देऊन मल्लप्पा चा खुण करण्यास सांगितले होते, असा जवाब दिला,यानंतर पोलीसानी या प्रकरणात अधिक लक्ष घालून तपास सुरू च ठेवला असता भिमु गोमू राठोड (रा दुधनी तांडा)याला ताब्यात घेतले असता भिमु राठोड याने सविस्तर हकीकत सांगितले आणि मल्लप्पा ची पत्नी लक्ष्मी सुनगार हिने मल्लप्पा ला मारून टाकण्यासाठी आपणांस 50 हजार रुपयांची उधार सुपारी दिल्याचे कबूल केले यानंतर यानंतर यातील हवालदार गिते  यांनी हिरोळी येथे जाऊन लक्ष्मी हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि विचारपूस केली, परंतु सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या लक्ष्मी सुनगार हिने पती मलप्पा सुनगार याचा खून करण्यासाठी आपण माझा प्रियकर सैफन उर्फ गटल्या बोबडे याला सांगितले होते.
यानंतर सैफन उर्फ गटल्या याने पती आपल्या प्रेमात अडसर ठरत आहे आणि त्याची पत्नी ही मल्लप्पा ला मारून टाकण्यासाठी सहमती दिली आहे, म्हणून त्याने दुधनी च्या  गांधीनगर तांडा येथील संजय हिरु राठोड (वय 27 ) याला सुपारी दिली, संजय राठोड याने आपले इतर साथीदार, अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22 वर्षे, रा हिरोळी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा ) आणि वाघेशा इरणा हनमशेट्टी (वय 30 वर्षे रा. हिरोळी ता. आळंद जि. गुलबर्गा ) या सर्वांनी मिळुन मल्लप्पा चा दिनांक 3 ते 4 ऑक्टोबर 20 च्या दरम्यान दुधनी च्या शिवारात खुण करून प्रेत सांगवी गावाजवळ नदी च्या पात्रात आणून टाकले होते.दिनांक 9 ऑक्टोबर 20 रोजी हे प्रेत स्थानिक नागरिकांना आढळुन आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन,प्रेत ताब्यात घेऊन तपास सुरू केले होते,तपासात आरोपीचा सुगावा लागल्या नंतर सर्वप्रथम सैफन उर्फ गटल्या बोबडे याला ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरविली असता मयताची पत्नी लक्ष्मी हिने प्रियकर गटल्या च्या साहाय्याने खून करण्याचा कट रचला आणि 50 हजाराची सुपारी मारेकरी यांना दिली, मारेकरी याना ही उधार सुपारी चांगली च महागात पडली, या खुण प्रकरणातील  सर्व आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक केली आहेत, या खुनाचा मुख्य सुत्रधार मयत मल्लप्पा याची पत्नी लक्ष्मी आणि दुसरा एक आरोपी संजय राठोड  (रा दुधनी तांडा) या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली. या खुण प्रकरणात आता पर्यत मयताची पत्नी लक्ष्मी सह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. के.एस पुजारी हे करीत आहेत.