कॉमर्स शाखेतील उच्च शिक्षणाची संधी आता उंब्रज मधेच ...

उंब्रजकरांची प्रतीक्षा संपली .....

कॉमर्स शाखेतील उच्च शिक्षणाची संधी आता उंब्रज मधेच ...

उंब्रज / प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयात २०२० या वर्षी पासून कॉमर्स शाखेला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या वर्षी पासून उंब्रज येथील महिला महाविद्यालयात कॉमर्स शाखेचा पहिला वर्ग सुरु होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी दिली. 

पुणे बंगलोर महामार्गावरील महत्वाची बाजारपेठ असलेल्या उंब्रज या गावात रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय पूर्वीपासून आहे. परंतु बऱ्याच वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना कॉमर्स शाखेच्या उच्च शिक्षणासाठी कराड किंवा सातारा येथे जावे लागत होते. परंतु या वर्षीपासून आर्टस् शाखेबरोबरच कॉमर्स शाखेचे देखील उच्च शिक्षण आता उंब्रज आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना येथील महिला महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता येथील मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची काही गरज पडणार नाही.