वादळ 'घोंगावत' आहे,

त्याला पाहिलं की आठवतो हॉलीवूडचा 'स्टार' आणि 'डेनिस लिली' सुद्धा, त्याचा रुबाब ऐट फक्त त्यालाच शोभून दिसते, 'नायक' आणि 'खलनायक' अशा दोन्ही भूमिका तो क्रिकेटच्या मैदानावर जगला. त्या स्वरूपात त्याच ऐटीत, त्याची देहबोली मैदानावर मैदानाबाहेर ही सेम वाटली. तो किती जणींच्या दिल की धडकन होता माहित नाही, पण क्रिकेट विश्वात तो सतत आयडॉल ठरला. अवघे क्रिकेटविश्व त्याला त्याच्या रूपात पाहत आलंय एक 'घोंगावणार' वादळ म्हणजे आपला अफजलभाई.sss

वादळ 'घोंगावत' आहे,
रणजीपटू द्रुतगती गोलंदाज अफजल पठाण
वादळ 'घोंगावत' आहे,

अनिल कदम/उंब्रज

अफजलचा जन्म वाईचा १ एप्रिल १९५० रोजी जैबून आणि कादिरखान या दांम्पत्याच्या पोटी झाला,त्याचे शालेय शिक्षण द्रविड हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण किसनवीर मध्ये तो खराखुरा बॉर्न क्रिकेटर, जिद्दी, लढवय्या कधीही हार न मानणारा जिंदादील माणूस,त्याचं क्रिकेट प्रेम लहानपणापासूनच फास्ट बॉलर व्हायचं त्याच वेड, त्यासाठी भरपूर मेहनत त्यान घेतली, पुण्यात खेळत असताना तो पायी मैदानावर जायचं आणि घाम गाळायचा.

फास्ट बॉलर मैदानावरचा सर्वात लक्षवेधी खेळाडू, कोणाच्याही नजरेत भरेल अशी त्याची पर्सनॅलिटी सहा फूट उंची, मजबूत बांधा, भरीव कपाळ, तरतरीत नाक, भेदक नजर, मानेवर झूलणारे केस अगदी आयडियल फास्ट बोलर,त्याची गोलंदाजी मी वर्षानुवर्षे जवळून म्हणजे २२ यार्डावरून पाहिलिय आहे.लांबलचक स्टार्ट, सुरेख रणअप,फलंदाजाला धडकी भरवणारी बॉलिंग एक्शन, भन्नाट वेग, त्याला अचूकतेची जोड संघासाठी कधीही, कितीही वेळ आणि कधीही गोलंदाजी करण्याची  विजिगिषुवृत्ती तो संघासाठी "नायक' तर विरोधी संघासाठी "खलनायक"असायचा. 

कॉलेजपासून दबदबा वेगाचा आणि त्याचा सुद्धा, जिथे जिथे तो खेळला तिथे तो गर्दी खेचायचा हजारो चाहते त्यांने मिळवले.बॉर्न फास्ट बॉलर असूनही तो दोस्तीतला राजा माणूस.सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तेच गोलंदाज असा लौकिक त्याने स्वकष्टाने मिळवला होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याची रणजी ट्रॉफी साठी महाराष्ट्र संघात निवड झाली.असा बहुमान मिळवणारा तो जिल्ह्यातला पहिला क्रिकेटर अहमदनगर येथे १९७९ बलाढ्य मुंबई विरुद्ध खेळताना त्याने तेजतर्रार गोलंदाजी करून चार बळी मिळवले आणि पाच निर्धाव षटके टाकली होती.सुनील गावस्कर, अशोक मंकड ,राहुल मंकड सह अनेक दिग्गज खेळाडू विरुद्ध त्याने त्वेषाने मारा केला त्याची दखल ही त्यावेळी अनेकांनी घेतली.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये त्याने दीर्घकाळ सेवा केली रमेश बोर्डे,निकि सलढाणा, विनायक खेडकर, रमेश हजारे, अन्वर शेख यांच्यासह दिग्गज खेळाडूंबरोबर तो खेळला. सातारा जिल्हा संघाचे नेतृत्व ही त्याने केले.जसदनवाला ट्रॉपीसह सातारा पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी येथील खुल्या स्पर्धेत ही त्याने छाप पाडली.सर्वच ठिकाणी त्याने चाहता वर्ग निर्माण केला १९७० ते १९९४ अशी २४ वर्षांची त्याची क्रिकेटची दैदिप्यमान कारकीर्द वयाच्या ५०/५५ व्या वर्षी तो त्याच त्वेषाने खेळला.जलदगती गोलंदाज सारखे तोडफोड फलंदाज करायचा, निवृत्तीनंतरही त्याने क्रिकेटशी असलेली नाळ कायम ठेवली. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही त्याच क्रिकेट प्रेम अबाधित आहे. आणि लोकप्रियताही गेल्याच आठवड्यात रणजीपटू विठ्ठल जोशी यांनी फोनवरून गप्पा मारताना त्याची चौकशी आवर्जून केली. त्याचे समकालीन युवा क्रिकेटपटू त्याच्याविषयी आदराने बोलतात, हा आदर त्याने कमावला आहे.अफजलची अफलातून गुणवत्ता जिद्द मेहनत लगन पाहता त्याला न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. एखादा "गॉडफादर" आणि "नशीब" असते तर तो नक्कीच भारतासाठी खेळू शकला असता. पण त्याबद्दल तो मात्र खंत व्यक्त करत नाही पण तरीही त्याच्या मनात ती सल असणारच.

वयाची ७१ वर्षे पूर्ण करणारा हा नायक पत्नी आणि मुल,नातवंड यांच्यासह सुखी आयुष्य जगतोय,सन्मानाचं वय झालं आता काय ! नाराजीचे सूर कधीही न काढणाऱ्या या "मुकद्दर" का "सिकंदर" ला सलाम

(सदरचा लेख शरद महाजनी यांच्या लेखणीच्या नजरेतून)

साताऱ्याची शान अफझल पठाण

हेमंत कानिटकर,सुनील गावसकर,दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर,अशोक मंकड,सुरू नायक,पांडुरंग साळगावकर, अंशुमन गायकवाड, अशा दिग्गजांच्या बरोबर क्रिकेट खेळलेल्या "त्या"काळात सातारा सारख्या ग्रामीण भागातील या हिऱ्याला १९७४/७५ ते ७९/८० पर्यत फक्त ५ सामने खेळायला मिळाले यामध्ये २९४ धावा देत ६ विकेट सुद्धा टिपल्या होत्या.यामध्ये बलाढ्य मुंबई विरुद्धच्या सामन्यात चार विकेट घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.तत्कालीन भारतीय संघात नवीन चकचकीत चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हातात देण्याची प्रथा असताना साताऱ्याची शान असणारा अफजल पठाण सारखा भन्नाट वेग असणारा गोलंदाज "वंचित" राहिला या सारखे दुसरे ते दुर्दैव काय आहे.