वाईत कोरोनो योद्धात शहीद झालेल्या पोलीस पत्नीच्या हस्ते हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण संपन्न...

वाई पोलीस ठाण्याचे कोरोनो बाधित होऊन शहीद झालेले हवलदार गजानन ननावरे यांच्या पत्नी श्रीमती प्रभावती ननावरे यांच्या हस्ते ध्वजा रोहण करून एक नवीन आदर्श वाई करांच्या समोर ठेवून एक वेगळा इतिहास निर्माण केल्याने वाईकर नागरिकांन सह कवठे तालुका वाई येथील ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले.

वाईत कोरोनो योद्धात शहीद झालेल्या पोलीस पत्नीच्या हस्ते हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण संपन्न....

दौलतराव पिसाळ / वाई प्रतिनिधी दि.16

वाई नगरपरिषदेच्या नगर अध्यक्ष सौ. डॉक्टर प्रतिभा शिंदे यांनी वाई शहरां मध्ये असणाऱ्या हुतात्मा स्मारक येथील 15 ऑगस्ट या दिनाचे ध्वजारोहण वाई पोलीस ठाण्याचे कोरोनो बाधित होऊन शहीद झालेले हवलदार गजानन ननावरे यांच्या पत्नी श्रीमती प्रभावती ननावरे यांच्या हस्ते ध्वजा रोहण करून एक नवीन आदर्श वाई करांच्या समोर ठेवून एक वेगळा इतिहास निर्माण केल्याने वाईकर नागरिकांन सह कवठे तालुका वाई येथील ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले आहेत. नगरा अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा शिंदे प्रतिनिधी शी बोलताना पुढे म्हणाल्या गेल्या मार्च महिन्यापासून वाई शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनो या विषाणूने थैमान घातले होते. या रोगाला थोपवण्या साठी वाई विभागाचे डी.वाय.एसपी अजित टिके वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शना खाली वाई शहरातील चौका-चौकात आणि चहू बाजूचे वाई शहरात येणारे रस्त्यांन वर जागो जागी पोलिस तैनात करून कोरोनो रोगावर मात करण्यासाठी सदैव प्रयत्न करत असताना यावेळी पोलिस दलातील हवलदार गजानन ननावरे यांना कोरोनो ची लागण होऊन त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेऊन वाई नगरीच्या नगराध्यकक्षा सौ. डॉक्टर प्रतिभाताई शिंदे यांनी गजानन ननवरे यांच्या मृत्यूचा आदर करून त्यांनी कोरोनो युद्धांत शहीद झालेले गजानन ननवरे यांच्या पत्नीच्या हस्ते शहरातील हुतात्मा स्मारक येथील 15 ऑगस्ट या दिनाचे ध्वजारोहण श्रीमती प्रभावती गजानन ननावरे यांच्या हस्ते व्हावे असा ठराव वाई नगरपरिषदेच्या सभाग्रहात उपस्थित सर्व पदाधिकारी नगरसेवक विरोधी पक्ष नेता मुख्याधिकारी यांच्या समोर मांडून तो सर्वानु मते मंजूर करून घेतला त्यांच्या या धाडसी पावलाचे समाजाच्या सर्व थरातून कौतुक होत आहे. याची निमंत्रण पत्रिका विरोधी पक्ष नेता सतीश वैराट यांनी श्रीमती प्रभावती गजानन ननवरे या राहत असलेल्या कवठे तालुका वाई येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले त्यामुळे 15 ऑगस्ट या दिनी कै. गजानन ननावरे (पोलीस हवालदार) कोरोनो योद्धा यांच्या पत्नी श्रीमती प्रभावती गजानन ननवरे यांच्या शुभहस्ते सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास ध्वजावंदन करण्यात आले नगराध्यक्ष डॉक्टर प्रतिभा शिंदे यांनी पोलीस दलातील शहीद पोलीस पत्नीच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचा मान दिल्याबद्दल वाई विभागाचे डी वाय एसपी अजित टिके वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे सपोनि आशिष कांबळे पीएस आय संजय मोतेवार राजेंद्र कदम आणि पोलीस कर्मचारी व त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी नगराध्यक्षा डॉक्टर सौ. प्रतिभाताई शिंदे यांचे आभार मानले आहे...