वाई मांढरदेवी घाटात भल्यामोठ्या दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प सुदैवाने जीवितहानी नाही...

वाई मांढरदेवी घाटात भल्यामोठ्या दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प सुदैवाने जीवितहानी नाही...

वाई मांढरदेवी घाटात भल्यामोठ्या दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प सुदैवाने जीवितहानी नाही...

दौलतराव पिसाळ/वाई प्रतिनिधी दि.13

वाई मांढरदेव नागमोडी असणाऱ्या तब्बल बारा किलोमीटर लांबीच्या घाटमाथ्यावर गेले तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने आज दि.13 रोजी पहाटे दरड कोसळली यामध्ये डोंगर माथ्यावरील मोठमोठे दगड आडवे पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. सुदैवाने या कोसळलेल्या दरडींमुळे कुठलाही अपघात की जीवित हानी झाला नसल्याने परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. डोंगर माथ्यावरील दरडी कोसळत असताना सुदैवाने त्यावेळी कुठलीही दुचाकी किंवा चारचाकी वाहने किंवा पादचारी आणि गुरे चारणारी यापैकी कोणी नसल्याने जीवित हानी टळली. पण दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वाई च्या बांधकाम विभागाचे उपअभियंता असलेले श्रीपाद जाधव यांना मांढरदेव ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले शंकर मांढरे यांनी घडल्या प्रकाराची माहिती दिल्याने ते तातडीने अत्यावश्यक जे.सी.बी ट्रॅक्टर आणि कामगार असा लवाजमा घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मशीन आणि कामगारांच्या साह्याने वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे. आता मांढरदेव घाटातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपत जाधव यांनी प्रीतिसंगमशी बोलताना दिली...