यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्व. पी डी पाटील यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्व. पी डी पाटील यांना जाहीर
आदरणीय पी. डी. पाटील

श्री कालिकादेवी पतसंस्थेकडून त्यांच्या कार्याचा मरणोत्तर सन्मान 

कराड/प्रतिनिधी : 

          श्री कालिकादेवी पतसंस्थेकडून दरवर्षी देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2020 स्व. पी डी. पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. आयुष्यभर चव्हाण साहेबांची विचारधारा जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पी डी. साहेबांची ओळख असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक चव्हाण यांनी दिली. 

        येथील श्री कलिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात बुधवारी 16 रोजी दुपारी 1 वाजता संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण सामजिक कृतज्ञता पुरस्काराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

        यावेळी श्री कलिकादेवी कुटुंबप्रमुख मुनिर बागवान, चेअरमन डॉ. जयवंत सातपुते, संचालक अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिरे, कार्यकारी संचालक विवेक वेळापूरे उपस्थित होते. 

         प्रा. चव्हाण म्हणाले, आज पी डी. साहेब हयात नसले तरी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्याचा संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून 22 नोव्हेंबर रोजी येथील वेणूताई चव्हाण सभागृहात पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.