अमेरिका : वॅली अंतराळ मोहिमेसाठी अविवाहित राहिल्या, आता त्यांच्यावर पुस्तक

ताओस (न्यू मेक्सिको) -७९ वर्षीय मेरी वॉलेस फंक (वॅली फंक) यांना पाहिल्यावर संधी मिळाली तर त्या अंतराळाच्या सफरीवर रवाना हाेतील, असे सहज वाटून जाते. स्पेस सूट सारखे जॅकेट. त्यावर वॅली यांचा लोगोही आहे. एका बाजूने वूमन इन एव्हिएशन इंटरनॅशनलचा बॅज आहे. या वयातही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. १.४० कोटी रुपये खर्च करून त्यांनी वर्जिनच्या अंतराळ सफरीचे तिकीट काढले आहे. अलीकडेच या अवलिया व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘वॅली फंक्स रेस फाॅर स्पेस : द एक्स्ट्राऑर्डनरी जर्नी ऑफ ए फिमेल एव्हिएशन पायोनिअर’ हे पुस्तक बाजारात आले आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी फ्लाइंग क्लास केला होता. १९६१मध्ये त्या अमेरिकी महिलांसाठी घेतलेल्या अंतराळवीराची परीक्षाही उत्तीर्ण झाल्या होत्या. तेव्हा २२ वर्षीय वॅली सर्वात तरुण उमेदवार होत्या. उड्डाणाबद्दल छंद होता. त्या लाकडी विमान तयार करत असत. मिसोरीच्या स्टिफन महाविद्यालयातून फ्लाइंग लायसेन्स मिळवल्यानंतर त्यांनी विमान उड्डाणास सुरुवात केली होती. त्यानंतर आेक्लाहोमा विद्यापीठ त्यांनी गाठले. तेथील वैमानिकांची फळी त्यांना आकर्षित करणारी होती. त्याचवेळी नासाने मर्करी हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पासाठी खासगी कंपनीकडून निधी मिळाला होता. त्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही संधी दिली जाणार होती. वॅलीची देखील निवड झाली होती. वास्तविक हा कार्यक्रम २५ ते ४० वर्षीय महिलांसाठी होता. फंक यांची १२ महिलांशी स्पर्धा होती. नासाने हा प्रकल्पच रद्द केला. महिलांनी या प्रकल्पात सहभागी व्हायला नको, हा तर्क देत प्रकल्प रद्द झाला होता. त्यानंतर अनेक वर्षे वॅली यांनी आपल्या क्षमतांबद्दल नासाला पत्र पाठवून कळवले. जवळपास ६० वर्षांपासून त्या आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत होत्या.वॅली दर शनिवारी उड्डाणाचा घेतात आनंदहे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी वॅली आयुष्यभर अविवाहित राहिल्या. जबाबदारी असती तर या मार्गावर पुढे वाटचाल करू शकले नसते, असे वॅली सांगतात. त्यांच्या या संघर्षाला त्यांचे जोडीदार स्यू नेल्सन यांनी ‘वॅली फंक्स रेस फाॅर स्पेस : द एक्स्ट्राऑर्डनरी जर्नी ऑफ ए फिमेल एव्हिएशन पायोनिअर’ या पुस्तकाद्वारे सविस्तरपणे जगासमोर मांडले आहे. ८० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वॅली अजूनही फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून आपली सेवा देतात. दर शनिवारी त्या उड्डाण करण्याचाही आनंद घेतात. अद्यापही थकणे व थांबण्याचा त्यांनी विचारही केलेला नाही. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Wally remains unmarried for the space mission, now a book written on them


 अमेरिका : वॅली अंतराळ मोहिमेसाठी अविवाहित राहिल्या, आता त्यांच्यावर पुस्तक

ताओस (न्यू मेक्सिको) -७९ वर्षीय मेरी वॉलेस फंक (वॅली फंक) यांना पाहिल्यावर संधी मिळाली तर त्या अंतराळाच्या सफरीवर रवाना हाेतील, असे सहज वाटून जाते. स्पेस सूट सारखे जॅकेट. त्यावर वॅली यांचा लोगोही आहे. एका बाजूने वूमन इन एव्हिएशन इंटरनॅशनलचा बॅज आहे. या वयातही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. १.४० कोटी रुपये खर्च करून त्यांनी वर्जिनच्या अंतराळ सफरीचे तिकीट काढले आहे. अलीकडेच या अवलिया व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘वॅली फंक्स रेस फाॅर स्पेस : द एक्स्ट्राऑर्डनरी जर्नी ऑफ ए फिमेल एव्हिएशन पायोनिअर’ हे पुस्तक बाजारात आले आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी फ्लाइंग क्लास केला होता. १९६१मध्ये त्या अमेरिकी महिलांसाठी घेतलेल्या अंतराळवीराची परीक्षाही उत्तीर्ण झाल्या होत्या. तेव्हा २२ वर्षीय वॅली सर्वात तरुण उमेदवार होत्या. उड्डाणाबद्दल छंद होता. त्या लाकडी विमान तयार करत असत. मिसोरीच्या स्टिफन महाविद्यालयातून फ्लाइंग लायसेन्स मिळवल्यानंतर त्यांनी विमान उड्डाणास सुरुवात केली होती. त्यानंतर आेक्लाहोमा विद्यापीठ त्यांनी गाठले. तेथील वैमानिकांची फळी त्यांना आकर्षित करणारी होती. त्याचवेळी नासाने मर्करी हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पासाठी खासगी कंपनीकडून निधी मिळाला होता. त्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही संधी दिली जाणार होती. वॅलीची देखील निवड झाली होती. वास्तविक हा कार्यक्रम २५ ते ४० वर्षीय महिलांसाठी होता. फंक यांची १२ महिलांशी स्पर्धा होती. नासाने हा प्रकल्पच रद्द केला. महिलांनी या प्रकल्पात सहभागी व्हायला नको, हा तर्क देत प्रकल्प रद्द झाला होता. त्यानंतर अनेक वर्षे वॅली यांनी आपल्या क्षमतांबद्दल नासाला पत्र पाठवून कळवले. जवळपास ६० वर्षांपासून त्या आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत होत्या.

वॅली दर शनिवारी उड्डाणाचा घेतात आनंद
हे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी वॅली आयुष्यभर अविवाहित राहिल्या. जबाबदारी असती तर या मार्गावर पुढे वाटचाल करू शकले नसते, असे वॅली सांगतात. त्यांच्या या संघर्षाला त्यांचे जोडीदार स्यू नेल्सन यांनी ‘वॅली फंक्स रेस फाॅर स्पेस : द एक्स्ट्राऑर्डनरी जर्नी ऑफ ए फिमेल एव्हिएशन पायोनिअर’ या पुस्तकाद्वारे सविस्तरपणे जगासमोर मांडले आहे. ८० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वॅली अजूनही फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून आपली सेवा देतात. दर शनिवारी त्या उड्डाण करण्याचाही आनंद घेतात. अद्यापही थकणे व थांबण्याचा त्यांनी विचारही केलेला नाही.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Wally remains unmarried for the space mission, now a book written on them