दक्षिण कोरियात भाजप नेत्या शाजिया इल्मी आणि पाकिस्तानी समर्थक एकमेकांसोबत भिडले, व्हिडिओ आला समोर

नवी दिल्ली - भाजपा नेता शाजिया इल्मी दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे पाकिस्तान समर्थकांसोबत भिडल्या. येथे काही लोक पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन भारत विरोधी घोषणा देत होते. तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अपशब्दांचा वापर केला. दरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, की शाजिया यांनी बहादुर भारतीय असल्याचे कर्तव्य पार पाडले. आम्ही भारताचा होणार अपमान सहन करणार नाही. त्यांना असे करण्यापासून रोखणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटलेशाजिया यांनी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, ''की मी आणि इतर नेता युनायटेड पीस फेडरेशन कॉन्फ्रन्स संपल्यानंतर आम्ही भारतीय दूतावासात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होते. तेथून परतत असताना काही लोक हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात घोषणाबाजी करत असल्याचे दिसले. तेथे अनेक लोक त्यांना पाहत होते. त्यांना असे करण्यापासून थांबवणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटले. कलम 370 रद्द केल्यामुळे कोणलाही काही अडचण असू नये असे आम्हाला वाटते. काश्मीरबाबत निर्णय घेणे ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे.''काही देशांमध्ये बोलण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही हे मला माहीत आहेशाजिया म्हणाल्या की आंदोलन भडकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांना आम्हाला तेथून घेऊन गेले. निषेध नोंदवणे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. पण मला माहीत आहे की, काही देशांत बोलण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही. या घटनेवेळी भाजप आणि आरएसएस नेता सोबत होते.शाजियाने भारत जिंदाबादची घोषणाबाजी केली3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आंदोलक पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचे दिसून आले. शाजियाने त्यांना पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरण्यास रोखले. यादरम्यान शाजिया आणि त्यांच्या साथीदारांनी 'भारत जिंदाबाद'ची घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत शाजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तेथून दूर केले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today South Korea| Shazia Ilmi said Important to protest if insulted as an Indian


 दक्षिण कोरियात भाजप नेत्या  शाजिया इल्मी आणि पाकिस्तानी समर्थक एकमेकांसोबत भिडले, व्हिडिओ आला समोर


नवी दिल्ली - भाजपा नेता शाजिया इल्मी दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे पाकिस्तान समर्थकांसोबत भिडल्या. येथे काही लोक पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन भारत विरोधी घोषणा देत होते. तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अपशब्दांचा वापर केला. दरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, की शाजिया यांनी बहादुर भारतीय असल्याचे कर्तव्य पार पाडले. आम्ही भारताचा होणार अपमान सहन करणार नाही.

त्यांना असे करण्यापासून रोखणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटले
शाजिया यांनी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, ''की मी आणि इतर नेता युनायटेड पीस फेडरेशन कॉन्फ्रन्स संपल्यानंतर आम्ही भारतीय दूतावासात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होते. तेथून परतत असताना काही लोक हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात घोषणाबाजी करत असल्याचे दिसले. तेथे अनेक लोक त्यांना पाहत होते. त्यांना असे करण्यापासून थांबवणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटले. कलम 370 रद्द केल्यामुळे कोणलाही काही अडचण असू नये असे आम्हाला वाटते. काश्मीरबाबत निर्णय घेणे ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे.''


काही देशांमध्ये बोलण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही हे मला माहीत आहे
शाजिया म्हणाल्या की आंदोलन भडकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांना आम्हाला तेथून घेऊन गेले. निषेध नोंदवणे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. पण मला माहीत आहे की, काही देशांत बोलण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही. या घटनेवेळी भाजप आणि आरएसएस नेता सोबत होते.


शाजियाने भारत जिंदाबादची घोषणाबाजी केली

3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आंदोलक पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचे दिसून आले. शाजियाने त्यांना पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरण्यास रोखले. यादरम्यान शाजिया आणि त्यांच्या साथीदारांनी 'भारत जिंदाबाद'ची घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत शाजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तेथून दूर केले.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
South Korea| Shazia Ilmi said Important to protest if insulted as an Indian