भोसलेवाडी ग्रामस्थांची 'त्याला' पकडा म्हणून उंब्रज पोलिसांत तक्रार

चरेगाव फाट्यावरील अपघातात संजय भोसले यांचे झाले होते अपघाती निधन

भोसलेवाडी ग्रामस्थांची 'त्याला' पकडा म्हणून उंब्रज पोलिसांत तक्रार

उंब्रज /प्रतिनिधी

भोसलेवाडी ता.कराड येथील  व्यावसायिक संजय महादेव भोसले यांचा शनिवार दि.२३ रोजी बाजरानिमित्त गेले असता चरेगाव फाट्यावर अपघात झाला होता.मेंदूला जबर मार लागला असल्याने उपचार सुरू असताना रविवार दि.२४ रोजी दुपारी त्यांचे निधन झाले होते.गेली पंचवीस वर्षे व्यापार करणारे संजय भोसले हे आपल्या दुचाकीवरून फिरून विविध गावच्या बाजारात व्यापाराच्या निमित्ताने जात असत परंतु दुर्दैवाने चरेगाव येथील अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले यानंतर मंगळवार दि.२६ रोजी रक्षाविसर्जन विधी पार पडल्यानंतर भोसलेवाडी ग्रामस्थ व कुटूंबियांनी उंब्रज पोलिसांत अपघाता बाबत चौकशीची मागणी करीत गुन्हा दाखल केला आहे.भोसलेवाडी ग्रामस्थांची 'त्याला' पकडा म्हणून उंब्रज पोलिसांत तक्रार केली आहे धडक देऊन पसार होणारा वजन वापरून सहीसलामत सुटण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा परिसरात आहे.

त्यांच्याकडे चौकशी नको

चरेगाव बिटचे  बीट अंमलदार  गुन्हा दाखल करायला आलेल्या कुटूंबियांना प्रत्यक्षदर्शी कोणीतरी आणा यासाठी दरडावत होते.ज्या व्यक्तीच्या घरातील कर्ता पुरुष अपघातात मयत झाला आहे.त्यांनी प्रत्यक्षदर्शी शोधायचे का ?असा संतप्त सवाल निर्माण झाला होता यामुळे संशयित आरोपीला मदतीची तर संबधित बीट अमलदाराची भावना नाहीना अशीच शंका उपस्थित केली जात होती यामुळे सदर प्रकरणाची त्यांच्याकडे चौकशी गेली तर न्याय मिळणार का याबाबत भोसलेवाडी ग्रामस्थांकडून शंका व्यक्त होत आहे

याबाबतची फिर्याद मयत संजय भोसले यांचा मुलगा अक्षय भोसले यांनी दिली आहे.दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताबाबत एकावर संशय व्यक्त केला असून संबंधिताच्या वाहनाचा नंबर तसेच इतर माहितीही दिली आहे.याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे सखोल चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करून ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.यावेळी भोसलेवाडी येथील ग्रामस्थ तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जमा झाले होते.

न्याय नक्की मिळेल

भोसलेवाडी ग्रामस्थांनी सदर अपघाताबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि बढे यांना पोलीस ठाण्यात समक्ष भेटून सविस्तर माहिती दिल्यानंतर रीतसर फिर्याद दाखल करण्यास सांगितले याबाबत निष्पक्ष चौकशी होऊन दोषी असणाऱ्यावर कारवाई होईल तसेच न्याय नक्की मिळेल याबाबत ग्रामस्थांना खात्री दिली