मनोजदादांच्या प्रयत्नाने कराड उत्तर मधील विकासकामांना ६०.५९ कोटी निधी

मनोजदादा घोरपडे यांचे कार्यकर्त्यांकडुण अभिनंदन.

मनोजदादांच्या प्रयत्नाने कराड उत्तर मधील विकासकामांना ६०.५९ कोटी निधी
मनोज दादा घोरपडे यांचे अभिनंदन करताना कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते

कराड उत्तर विधान सभा मतदार संघातील विकास कामांसाठी ६०.५९ कोटी निधी प्राप्त झाला आहे. निधीसाठी कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी वेळोवेळी वरीष्ठांशी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाअध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध झाला असुन मतदार संघातील रस्ते व इतर सुविधांसाठी ६०.५९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मनोजदादा घोरपडे यांचे मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन केले. 

 

 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन येणाऱ्या काळामध्ये कराड उत्तरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मंजुर करुन रखडलेले सर्व प्रकल्प व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मा. मनोजदादा यांनी उपस्थितांना दिले.

 

 

यामध्ये प्रामुख्याने बोरगाव-नांदगाव-तारगाव रस्ता, निसराळे-जावळवाडी-नांदगाव-तारगाव रस्ता, इंदोली-चोरे-मरळी-पाली रस्ता, अंतवडी अर्पोच रस्ता, धावरवाडी पाल रस्ता, मसुर रेल्वे स्टेशन ते कोनेगाव रस्ता, तासवड ते कराड रस्ता, पाल ते अतीत रस्ता, चोरजवाडी ते साखरवाडी रस्ता, पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता, तारगाव ते बोरबन रस्ता, पिंपळी ते सुरली रस्ता, साप ते वेळु रस्ता आदी कामांचा समावेश आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघ हा चार तालुक्यांमध्ये विभागला असुन प्रत्येक तालुक्याला समान निधी मिळाला आहे. पुढील कालावधीमध्ये प्रत्येक गावांमध्ये मागणीनुसार निधी उपलब्ध करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कराड उत्तर मतदार संघामध्ये पक्षाचे आमदार नसताना सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी देऊन २०२४ ला कराड उत्तर मध्ये परीवर्तण घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. याप्रसंगी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, रहिमतपुर नगरीचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका, शशिकांत गवळी, तानाजी घाडगे, बबन माने, तुकाराम नलवडे, सोमनाथ निकम, अधिक सावकार, विठ्ठल काकडे, वैभव चव्हाण, प्रशांत भोसले, सुनिल दळवी, रमेश कदम, राजेंद्र घाडगे, विक्रम बागल, सोमनाथ सुतार, बाळासो पाटील, निलेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.