प्रगतशील शेतकरी  चंद्रकांत कमळापुरे सावकार यांचे दुःखद निधन

प्रगतशील  शेतकरी  चंद्रकांत कमळापुरे सावकार यांचे दुःखद निधन

अचलेर गावचे प्रगतशील आणि  आधुनिक शेतकरी  म्हणजे चंद्रकांत कमळापुरे सावकार यांचे दुःखद निधन


सोलापूर /प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील अचलेर गावचे अंत्यत शांत संयमी आणि विचारवंत असलेले व आधुनिक शेती मध्ये अंत्यत हुशार असलेले अचलेर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये सर्वात अगोदर आधुनिक आणि विविध तंत्रज्ञान वापरून शेती करणारे आमचे प्रगतशील शेतकरी अचलेर गावचा हिरा असलेले  मा चंद्रकांत कमळापुरे  सावकार यांचे  आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मृत्यु समयीं ते जवळपास 75 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुना नातवंडे आणि मुली  आई असा फार मोठा परिवार आहे. चंद्रकांत कमलापुरे सावकार यांचे दुःखद निधन म्हणजे तरुण पिढीसाठी अंत्यत दुःखद घटना आहे  
कारण चंद्रकात कमळापूरे सावकार हे अचलेर गावातील अंत्यत प्रतिष्ठित व्यक्ती तर होतेच,  पण ते केवळ प्रगतशील च नाही तर आधुनिक शेतकरी होते.  


 अचलेर गावात सर्वप्रथम कमलापुरे सावकार यांनीच आधुनिक पध्दतीने शेती करण्यास प्रारंभ केला,  आणि हे करत असताना त्यांनी त्याला विविध चालू तंत्रज्ञानाची जोड दिली.  आधुनिक शेती करणे हे  जरी खर्चिक असले तरी त्यांनी हे तंत्रज्ञान वापरले आणि शेतीचा विकास साधला अचलेर च्या तरुण पिढीला चंद्रकांत कमळापुरे यांचे शेतीसाठी चे योगदान फार मोठे राहिले आहे.ते अचलेर व पंचक्रोशीतील प्रत्येक गावात सावकार म्हणुन च ओळखले जात होते त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.