झोपडपट्टीवासीयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू-खा. उदयनराजे भोसले

झोपडपट्टीवासीयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू-खा. उदयनराजे भोसले

झोपडपट्टी वासियांच्या मदतीसाठी प्रयत्न करू – उदयनराजे भोसले

कराड/प्रतिनिधी :

             कराडला आलेल्या महापुरामुळे येथील पाटण कॉलनीतील झोपडपट्टी वासियांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आम्हाला शासनाने पक्की घरे बांधून द्यावी व आमचे पाटण कॉलनीमध्येच पुनर्वसन करण्याची मागणी खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे केली. यावेळी पुनर्वसनाचा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नसून खासदार निधीतून पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांना मदत करण्याचा प्रयत्न करेन, त्यासाठी बाधीतांनी आपल्या मागण्या सविस्तरपणे द्याव्यात. त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

            येथील पूर परीस्थिटी व पाटण कॉलनीतील पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांचे नगरपालिकेच्या शाळा क्र. 3 मध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांची विचारपूस  करण्यासाठी शुक्रवारी 9 रोजी खासदार उदयनराजे भोसले आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.