पृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची दांडी

कराडात उलट-सुलट चर्चाःनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबांची पालिकेत एन्ट्री

पृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची दांडी

पृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची दांडी


कराडात उलट-सुलट चर्चाःनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबांची पालिकेत एन्ट्री

 

गतवर्षी कोरोना महामारीचे थैमान जगभर सुरू झाले. यावेळी अख्खे जग स्थब्ध झाले होते. अशात प्रत्येकजण कोणती ना कोणती मदत सामाजिक भावनेतून करत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये कोवीड सेंटर सुरू केले होते. त्या पाढोपाढच आमदार निधीतून कराड व मलकापूर नगरपालिकेसाठी अत्याधुनिक रूग्णवाहिका देण्यात याव्यात असे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले. आणि मलकापूर नगरपालिकेने ही रूग्णवाहिका तात्काळ स्वीकारली. मात्र कराड पालिकेने स्वीकारली अथवा नाकारली हे कळविले नाही. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. पृथ्वीराज बाबांनी शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यावेळी पालिकेतील संबंधीत अधिकार्‍याला आपण रूग्णवाहिका घेणार नसाल तर तसा ठराव करून कळवा तो निधी मी अन्यत्र विकासकामासाठी देतो. असे सुनावल्यानंतर पालिकेत हलचाल झाली व ही रूग्णवाहिका अखेर कराड पालिकेने स्वीकारली. पालिकेची रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. तोही वादातीतचकराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गतवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे राहिले. प्रचारात सहभागी झालेले बाबा यांना कराडकरांनी साथ दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडी सत्तेत आली. मुळातच ही बनलेली आघाडी तीन आघाडयांची होती. जनशक्ती-यशवंत-लोकसेवा अशी एकत्रित येवून बनलेली आघाडी आणि त्यामध्ये असलेले उमेदवार निवडून यावेत याकरिता बाबांनी कराडचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढला. त्यांना येथील जनतेने साथ दिली. व बहुमताने त्यांची सत्ता स्थापन झाली. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पालिकेत सत्ता ही कायम जनशक्तीची राहिली. कराडकरांनी साथ दिली मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी निकालाच्या दुसर्‍याच दिवशी बाबांची साथ सोडली हे कराडकरांना पचणी पडले नव्हते. कराडकरांनी कायम योग्य संधीची वाट पाहिली आहे. याचा प्रत्येय प्रत्येक निवडणुकीवेळी पाहिलाही मिळाला आहे.


विधानसभेची निवडणूक गतवर्षी पार पडली. यावेळी हे यातील बहुतांश नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचा प्रचार करताना पहायाला मिळाले. मात्र कराडकरांनी पालिकेच्या निवडणुकीचा इतिहास डोळयासमोर ठेवत पुन्हा बाबांना साथ दिली. एकतर्फी मतदान पृथ्वीराज बाबांना कराडात पडले. तेथूनच सुरू झाला पुन्हा पालिकेचा संघर्ष . हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक पृथ्वीराज बाबांचा प्रचार करताना दिसत होते. ज्यांना निवडून आणण्यासाठी बाबा फिरले त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली मात्र ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्या उर्वरीत नगरसेवकांनी व लोकशाही आघाडीने पृथ्वीराज बाबांना साथ दिली हे राजकीय समीकरण भविष्याची नांदी ठरले. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अनेक नवखे चेहरे पृथ्वीराज बाबांना थेट भेटू लागले. कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुक लढायची आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत असल्याचे पहायला मिळू लागले. परंतू गतवेळी आलेला अनुभव बाबा विसरलेले नाहीत त्यामुळे येणारी निवडणुकही पक्षाच्या चिन्हावरच लढवणार यात मात्र शंका नाही.


नगरपालिकेची निवडणूक अवघी सहा महिन्यावर येवून ठेपली आहे. अश्यातच बाबांनी काल पालिकेत एन्ट्री केली. तीही कराडकरांच्या सेवेच्या भावनेतून कारण कोरोनाची रूग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. अश्यातच त्यांच्या निधीतून आलेल्या रूग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ही उपस्थितीच कराडच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेली जात आहे. अश्यातच सध्याचे विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव हे दोघेही आपल्या समर्थकासह पालिकेत हजर नव्हते. हे कशाचे धोतक.! आपण व आपले समर्थक निवडून येण्यासाठी पृथ्वीराज बाबांनी केलेला प्रचार चालतो मात्र शहराच्या विकासाच्या कामासाठी आलेले बाबा पालिकेत चालत नाहीत. ही मानसिकता बदलने गरजेचे आहे. कारण कराडकर उघडया डोळयाने सर्व पाहत आहेत. उद्याच्या निवडणुकीत काय घडणार? कोण कोण बरोबर जाणार? हे काळाच्या प्रसंगावधानाने सिध्द होईल. त्यावेळी आपल्या आपण कोणाबरोबर असणार याचे आत्मचिंतन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. राजकीय समीकरणे बदलत जातील. शहराचा विकासही होईल. त्यात आपण सहभागी असणे पालिकेचे प्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा काळ माफ करणार नाही...!


जनशक्ती पृथ्वीराज बाबांच्या बरोबर पालिकेच्या निवडणुकीत दिसली तर नवल वाटणार नाही..

पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसापासून कराडात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. त्यांच्या वाढदिनी शुभेच्छाच्या फलकावर जनशक्ती आघाडीचे  अध्यक्ष अरूण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, अतुल शिंदे यांचे फोटो जळकले. आणि शहरात चर्चेला उधान आले. असतानाच काल बाबा पालिकेत गेले यावेळीसुद्धा माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव आणि अतुल शिंदे  यांची उपस्थिती होती. यावरून आगामी काळात जनशक्ती पृथ्वीराज बाबांच्या बरोबर पालिकेच्या निवडणुकीत दिसली तर नवल वाटणार नाही. अशी चर्चा सध्या कराड शहरात सुरू आहे.

 

कराड -प्रतिनिधी