आरोग्य आणि पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण ..!

पुरवठा,अन्न औषध,दारूबंदी,ग्रामपंचायत विभाग बेपत्ता...

आरोग्य आणि पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण ..!

आरोग्य आणि पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण ..!

पुरवठा,अन्न औषध,दारूबंदी,ग्रामपंचायत विभाग बेपत्ता...

कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याचा ठेका आरोग्य आणि पोलीस विभागाने उचलला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.पुरवठा,अन्न औषध आणि दारूबंदी विभाग फक्त 'मंथली' साठीच येरझाऱ्या घालत असल्याची परिस्थिती असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे.अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून प्रशासनातील इतर विभाग कुंभाकर्णी झोपेत असल्याने पगाराला पुढे असणारी प्रशासनातील पुरवठा,अन्न औषध,दारूबंदी,ग्रामपंचायत विभागतील मंडळी 'मलिदा'लाटायला पुढे मात्र जबाबदारी घ्यायला मागे असल्याची चर्चा नागरिकांच्यात जोर धरू लागली आहे.

पुरवठा विभाग कोमात

महसूल खात्यातील पुरवठा विभाग अन्नधान्य पुरवठा आणि त्याचे दर याबाबत नियंत्रण ठेवत असतो परंतु स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर अंकुश ठेवणारा विभाग खाजगी व्यापाऱ्यांच्या बाबतीत अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे.बेफाम साठेमारी,अवास्तव दर आणि चढ्या भावाने विक्री यामुळे लॉकडाऊन कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असताना पुरवठा विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दारूबंदी विभाग निस्तेज

दारू वाहतूक आणि अवैध विक्री करणारावर कारवाई करण्याचे सोपस्कार हे स्टेट एक्साईज विभागाचे काम असून चिरीमिरीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्याचा पराक्रम या विभागाकडून होत असून महिन्याच्या सुरुवातीला मंथली घेण्यासाठी बिनबोभाट हजेरी लावणारे या विभागाचे कर्मचारी अवैध दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

अन्न औषध विभाग नाममात्र

कडक निर्बंध असताना गुटखा,तंबाखूजन्य पदार्थ यांची विक्री करणे कायद्याने बंधनकारक असून यासाठी अन्नऔषध विभाग कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही पोलिसांनी बेकायदा गुटखा पकडायचा आणि अन्न औषध विभागाच्या ताब्यात द्यायचा परंतु मूळ या विभागाचे कार्य हे नाममात्र असून स्वतःहून किती कारवाया केल्या हा संशोधनाचा विषय असून मेडिकल मध्ये औषधांचा तुडवडा किंवा होणारा काळाबाजार रोखणे हे याच विभागाचे कर्तव्य असून नाममात्र अस्तित्व असणारा हा विभाग कोमात गेल्याने वरकमाई जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर

कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे.परंतु काही अपवाद वगळता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून ग्रामपंचायत प्रशासन नामानिराळे राहत असल्याने परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे.गावातील बाजारपेठ यांचेवर नियंत्रण ठेवणे, फवारणी करणे, स्वच्छता करणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या या ग्रामपंचायतीच्या आहेत परंतु दुर्दैवाने यामध्ये गटविकास अधिकारी यांची कचखाऊ वृत्ती आणि ग्रामसेवकांची चालढकल करण्याची प्रवृत्ती नागरिकांच्या मुळावर घाव घालत आहे.यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर असल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होणार असल्याची चर्चा आहे.

आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या इतर विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली तरच कोरोना महामारीचा सामना करणे सोपे जाणार आहे अन्यथा कोरोना महामारीचा भयानक उद्रेक झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण झालेस याची झळ सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सोसावी लागणार आहे

 

अनिल कदम / उंब्रज