कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम
स्मिता हुलवान (माजी सभापती महिला व बालकल्याण समिती, कराड नगरपालिका)

कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम 

कराड/प्रतिनिधी : 

         कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने  २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 

        अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर परिषद, नगरपरिषद महासंघ यांनी २०१४ सालापासून राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यातील पालिकांच्या महिला व बालकल्याण समित्यांकडून विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आली होती. पुरस्कारासाठी समित्यांची निवड करण्यासाठी अनुभवी नगरसेविकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने 'ब' वर्गात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे.

       नगरपालिका व नगरपंचायत गटात पहिले तीन व उत्तेजनार्थ असे एकूण १३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी याबाबतचे पत्र कराड नगरपालिकेस पाठवले आहे.  

       स्मिता हुलवान यांनी कमिटीमार्फत विविध योजना व उपक्रम राबवले. यात प्रामुख्याने महिलांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण तसेच मोफत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी या समितीने विविध उपक्रम राबवले आहेत. चार वर्षांत या समितीला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. 

स्मिता हुलवान यांच्या कामाची दखल 

कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद २०१७ पासून सलग 4 वर्षे स्मिता हुलवान यांनी भुषवले. माजी सभापती स्मिता हुलवान यांनी केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली असून समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्धल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.