सातारा जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर

सातारा जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर

सातारा :

 सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज  (साेमवार) सातारा जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी दिली. या रुग्णास मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले  उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हा युवक त्याच्या घरी गेला. आगामी चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल असे डाॅ. गडीकर यांनी नमूद केले.


जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले सातारा जिल्ह्यात 33 काेराेनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दाेन जणांचा मृत्यू झाला. सध्यस्थितीत 27 रुग्ण उपाचार घेत आहेत. त्यापैकी काही ज्येष्ठ आहेत तर काही एकदम लहान आहेत. दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथील 15, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 20 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 असे एकूण 65 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

याव्यतरिक्त 26 एप्रिलला रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 35, उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 43 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 14 असे एकूण 95 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.