बुधवारच्या 52 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येने जिल्हा हादरला,एकूण रुग्ण 394 झाले

बुधवारच्या 52 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येने जिल्हा हादरला,एकूण रुग्ण 394 झाले

 

बुधवारच्या पहाटे हादरला सातारा


कराड/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधीतांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ जिल्हावासीयांची धडधड वाढवत आहे. मंगळवारी रात्री निव्वळ सहा बाधित रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने नागरीकांना थाेडासा दिलासा मिळाला हाेता. परंतु बुधवार पहाटेच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येने झाेपेत असणारे सातारकर खडबडून जागे झाले.जिल्ह्यातील काेराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का दिला. तब्बल ५२ नव्या रुग्णांची भर पडली असून वाई तालुक्यातील आसले व पाटण तालुक्यातील जांभेकर वाडी येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे.  सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३९४ वर तर मृतांची संख्या अकरा वर पोहचली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

उंब्रज ता.कराड येथील २९ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे.सदरची महिला मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत असून मुबई येथील कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने तसेच सतत कर्तव्य बजावत असताना कार्यरत असल्याने तीन दिवसांची सुट्टी टाकून आपल्या १ वर्षाच्या चिमुकल्याला भेटायला आलेल्या मातेला उंब्रज मध्ये आल्यानंतर ताप येऊ लागल्याने उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता त्यांना कराड येथे घशातील स्त्राव तपासणी साठी पाठवले होते यानंतर रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये पॉझिटीव्ह अशी माहिती मिळाली सदरची पोलीस अधिकारी महिला व कुटुंब हे मुंबई वरून आल्यानंतर होम क्वारंटाईन असल्याने धोका कमी आहे.मात्र तरीही पोलिसांनी सदरचा परिसर सील केला आहे.
 
मंगळवारी  रात्री उशिरा नवारस्ता ता. पाटण येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले हाेते.

सातारा जिल्ह्यात मुंबईहून तसेच परराज्यातून आलेल्यांची बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारचा अपवाद वगळता बाधीतांच्या आकडा सातत्याने दोन अंकीच येत आहे. मंगळवारी केवळ कऱ्हाड व पाटण तालुक्यातील प्रत्येकी तीन रुग्ण आढळले. आज बुधवार सकाळी मात्र पुण्याच्या एन सी सी एस कडून आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने ५२ बाधित रुग्ण वाढले आहेत. यात कऱ्हाड तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हासोली येथील एक व खराडे येथील दोन बाधित सापडले.  म्हासो ली येथील साखळी यापूर्वीची असून खराडे येथे नव्याने रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. याबराेबरच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय  बाधिताचा  तसेच जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

*तालुकानिहाय कोरोना बाधित*

*माण तालुका*- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2
*सातारा तालुका*- जिमनवाडी 2,  खडगाव-1, कास बुद्रुक 1
*वाई तालुका*- आकोशी-1,  आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1
*पाटण तालुका* -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,  
                            जांभेकरवाडी 1 (मृत्यु)
खंडाळा तालुका- अंधोटी 2, घाटदरे 1 व पारगाव 7
जावळी - सावरी 3, केळघर 2
महाबळेश्वर तालुका- कासरुड 3, देवळी 3 गोळेवाडी 1
कराड तालुका- खरोड 2, म्हासोली 1, वानरवाडी  1, उंब्रज 1
फलटण तालुका सस्तेवाडी 1
खटाव- वांझोळी 1 वरची अंभेरी 1