कारखान्याला लाभाले डॉक्टर चेअरमन

कारखान्याला लाभाले डॉक्टर चेअरमन

कारखान्याला लाभाले डॉक्टर चेअरमन


कृष्णेचा संघर्ष सुरू होता तर कारखान्यावर सुवर्णकाळही सुरू होता. कृष्णेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या पाच तालुक्यातील लोकप्रतिनिधींना मोहितेंच्या कारभाराची चिंता लागली होती. अंतर्गत एकी सुरू झाली होती. अशातच 1995 च्या विधानसभा निवडणूकीत यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. कारखान्याची सत्ता हाती असल्याने आपणाला भविष्यात त्रास होणार हे विलासकाका उंडाळकर यांनी ओळखले. विधानसभेच्या निवडणूकीत काका विजयी झाले आणि डॉ.मोहिते यांचा पराभव झाला. काकांनी आगामी काळात विधानसभेचे समीकरण निश्चित केले. जे आपल्या निवडणूकीचे काम करतील त्यांना कृष्णेच्या निवडणूकीत मदत करायची. जिकडे काका तिकडे गुलाल असे लोक त्यावेळी म्हणत होते. त्याचे कारणही असे होते कारखान्याचा कारभार चांगला इतिहासात पहिल्यांदा कारखान्याने चार अंकी दर देण्याचा उच्चांक केला. 1989 ते 1999 मध्ये सातत्याने चढता ऊस दर दिला. तरीही कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीत रयत पॅनेलचा पराभव झाला आणि सहकार पॅनेल सत्तेवर आले.


सहकार पॅनेलचे नेतृत्व डॉ. सुरेशबाबांच्या कडे होते. सुरेशबाबा कारखान्याचे चेअरमन झाले. अत्यंत संयमी, मोजके बोलणे, शांत स्वभाव असलेले हे नेतृत्व कृष्णेला लाभले. जयवंतराव आप्पांचे मार्गदर्शन घेत सुरेशबाबांनी आपली कारकीर्द चांगल्या पद्धतीने चालविली. सुरेशबाबांच्या कालखंडात कृष्णा कारखान्यावर गणेश मंदिर उभारण्यात आले. सर्वाना बरोबर घेवून येणार्‍या लोकांची अडचण समजून घेवून कारखान्याचा कारभार ते करत होते. संचालक चिडले , सभासद तक्रार करीत आले तरी सुरेशबाबा शांतपणे ऐकून घेवून यावर मार्ग काढत असत. कारखान्याच्या या कालखंडामध्ये पाठीमागून आलेला ऊसाच्या दराचा चढता क्रम सुरेशबाबांनी कायम ठेवला. पाच वर्षांची मुदत 2004 ला संपत असताना ऊसावर लोकरी मावा पडण्याचा रोग आला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या कालखंडात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहत. लोकरी माव्यावर औषद फवारणी करण्याकरीत करखान्याने पुढाकारी घेतला. सभासदांना याचा पुरवठा केला जात होता.


लोकरी मावा आला आणि सुरेश भोसलेंच्या संचालक मंडळाला एक वर्ष वाढवून मिळाले. राज्य शासनाने या नैसर्गिक आपत्तीमुळे निवडणूका पुढे ढकलल्या. कारखान्याच्या निवडणूका 2005 मध्ये होणार हे निश्चित झाल्या नंतर विद्यमान संचालक मंडळ वर्षभर जोमाने कामाला लागले. निवडणूकीचा रागरंग सुरू झाला. कारखान्याचा निवडणूक प्रोग्रम जाहीर झाला. या निवडणूकीचे पडघम सुरू असतानाच अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेशबाबांनी आपला अर्ज दाखल केलाच त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र डॉ. अतुलबाबांचा अर्ज दाखल केला. आणि आगामी काळात आपले सुपुत्र राजकारणाच्या पटलावर आणण्याचा निर्णय घेतला.

राजकीय दृष्ट्या जागरूक असलेले आणि काळाची पावले आधीच ओळखणारे विलासकाका यांनी आपली भुमीका बदलली व मोहितेंना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात डॉ. अतुल भोसले हे आपले प्रतिस्पर्धी होवू शकतात. म्हणूनच काकांनी केवळ हा निर्णय घेतला. मोहितेंनी त्यांना शब्द दिला आम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 2005 मध्ये कारखान्याच्या निवडणूकीत सत्तांतर झाले. मात्र या निवडणूकीत रयत पॅनेलचे नेतृत्व मदनदादा करत होते. पण या निवडणूकीच्या रिंगणात डॉ. इंद्रजितबाबा होते. निकाल झाला. रयत पॅनेल सत्तेवर आले.

सहा वर्षाचा कालखंड डॉ. सुरेशबाबांचा संपला आणि कृष्णेला पुन्हा डॉक्टर  चेअरमन मिळाला. इंद्रजितबाबा कारखान्याचे चेअरमन झाले. नियोजन मंडळात ज्या ठिकाणी भाऊ बसत होते त्याच ठिकाणी मदनदादा बसून कारखान्याचे मार्गदर्शन इंद्रजितबाबांना करत होते. मात्र डॉ. इंद्रजित मोहिते हे कारखान्यातील 13528 वादग्रस्थ सभासदांची केस न्यायालयात सुरू असताना स्वतःउपस्थित राहायचे त्यामुळे त्यांचा सहकाराचा अभ्यास प्रचंड झाला होता किंबहुना ते सहकाराचे डॉक्टर झाले होते. असा अभ्यासु चेअरमन कारखान्याला लाभला होता. त्यांच्या कालखंडात कारखान्याने महत्त्वाचे प्रोजेक्ट हाती घेतले आणि ते पुर्णत्वास नेले. त्यांनी सर्वात मोठा प्रोजेक्ट केलेला कोजनरेशन प्रकल्प हा कारखान्याच्या प्रगतीत महत्त्वाचा ठरला. आणि त्यांची अशी राहिली कारकीर्द सुरू....


क्रमश...