मेव्हण्यानेच केला दाजीचा खून

कराडातील वाखाण परिसरात बहिणीला दारू पिऊन वारंवार शिवीगाळ व मारहाण करत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मेव्हण्यानेच केला दाजीचा खून

मेव्हण्यानेच केला दाजीचा खून 

कराडातील घटना ः बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणा रागातून कृत्य


कराड/प्रतिनिधी : 
           बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना येथील वाखाण परिसरात घडली आहे. 
गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मजूरीचे काम करत असलेल्या दाजीचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. 
         नितीन नागेश भालशंकर रा. वाखान परिसर (कराड), मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवि रमेश कुडवे रा. वाखाण परिसर (कराड), मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

          याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील वाखाण परिसरात नितीन भालशंकर हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो वारंवार दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. याच रागातून चिडून जाऊन नितीनच्या मेव्हण्याने दाजीचा गळा दाबून त्यानंतर त्याच्या छातीवर दगडाने ठेचून खून केला. 
         घटनेची माहिती मिळताच 
तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून तपासाची गती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.