पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानकडून पर्सनल प्रोटेक्शन किटचे वाटप

पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानकडून पर्सनल प्रोटेक्शन किटचे वाटप

कराड/प्रतिनिधी : 
           सध्या कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय व पोलीस अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना सर्व स्तरातून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व स्टाफ यांच्या सुरक्षेसाठी पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने संपुर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पर्सनल प्रोटेक्शन किट वाटप करण्यात आले आहे. 
           यावेळी फलटण मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश खराडे व विराज खराडे उपस्थित होते. हे किट फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गायकवाड यांच्याकडे फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते देण्यात.