राज्यातील महाविकास आघाडी सरकार लुटारू - गणेश ताटे

सध्या कोरोना संकटामुळे बिकट  परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कष्टकरी, कामगारांचे मोठे हाल सुरु आहेत. मात्र, त्यांच्या विविध समस्या व प्रश्‍नांबाबत महाविकास आघाडी सरकार अजिबात  संवेदनशील नाही. जे मिळतयं ते लुटायचं अशा पद्धतीचने सरकारचे काम सुरु असून हे लुटारू असल्याचा आरोप भाजपच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे यांनी केला. तसेच कामगारांच्या प्रश्नाकडे  या सरकारने दुर्लक्ष केल्यास कामगार आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लुटारू - गणेश ताटे
कराड : पत्रकार परिषदेत बोलताना भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लुटारू - गणेश ताटे 

कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईमध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा  

कराड/प्रतिनिधी
          सध्या कोरोना संकटामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कष्टकरी, कामगारांचे मोठे हाल सुरु आहेत. मात्र, त्यांच्या विविध समस्या व प्रश्‍नांबाबत महाविकास आघाडी सरकार अजिबात  संवेदनशील नाही. जे मिळतयं ते लुटायचं अशा पद्धतीनेच सरकारचे काम सुरु असून हे लुटारू सरकार  असल्याचा आरोप भाजपच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे यांनी केला. तसेच कामगारांच्या प्रश्नाकडे  या सरकारने दुर्लक्ष केल्यास कामगार आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
         कराड दौऱ्यादरम्यान येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी 14 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कागार आघाडीचे सरचिटणीस केशव घोळवे, प्रिती व्हिक्टर, राजश्री जायभाव, अशोक वणवे, तुळशीदास दुडे-पाटील, हणमंत लांडगे, निलेश बदडे, प्रमोद शिंदे, एकनाथ बागडी, अलीमहंमद आगा, विश्‍वनाथ फुटाणे, सुहास चक्के उपस्थित होते.
          प्रदेशाध्यक्ष ताटे म्हणाले,  महाविकास आघाडी सरकारजनतेच्या प्रश्नांबाबत पूर्णतः उदासीन आहे. केवळ आपला राजकीय फायदा करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून ते जनतेच्या मताचा पूर्णपणे अनादर करत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. एका अभियंत्याला कार्यालयात बोलवून  सरकारमधील मंत्र्याने त्याला केलेली  मारहाण, दुसर्‍या मंत्र्याच्या भावाकडून कामगारांना होत असलेली मारहाण, राज्य परिवहन महामंडळातील 50 पेक्षा जास्त वय असणार्‍या कामगारांवर आणलेला स्वेच्छा निवृत्ती प्रस्ताव, राज्यातील 27 ते 28 हजार कामगारांवर लटकणारी बेरोजगारीची टांगती तलवार आदी. परिस्थिती हे या सरकारचे खरे कर्तुत्व आहे. त्यामुळे या सरकारचे सर्वसामान्यांना लुटण्याचे उद्योग सुरु असून हे सरकार कामगारांच्या समस्या व त्यांच्या प्रश्नांबाबतीत संवेदनशील नसल्याचे त्यांनी सांगितले. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम