उंब्रज पोलीस ठाण्यात उभारला सॅनिटायझेशन  कक्ष... जिल्हा पोलीस प्रमुखांची संकल्पना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावले असताना कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांचा कोरोनापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस दलामार्फत सॅनिटायझेशन कक्षाची पोलीस ठाण्याच्या आवारात उभारणी करण्यात आली आहे.

उंब्रज पोलीस ठाण्यात उभारला सॅनिटायझेशन  कक्ष...  जिल्हा पोलीस प्रमुखांची संकल्पना

उंब्रज / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावले असताना कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांचा कोरोनापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस दलामार्फत सॅनिटायझेशन कक्षाची पोलीस ठाण्याच्या आवारात उभारणी करण्यात आली आहे.

उंब्रज येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात प्रथमच सॅनिटायझेशन कक्ष उभारण्यात आला आहे.उंब्रजसह १११ गावातील ग्रामीण भागासह वाडीवस्त्यांवर सततची सेवा देणार्या पोलीस अधिकारी, कर्मचारी,होमगार्ड यांना कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्या सकंल्पनेतून   सॅनिटायझेशन  कक्ष उभारला असून पोलीसांची घेण्यात येणारी दक्षता कौतुकास्पद आहे.बंदोबस्ताच्या ठिकाणाहून पोलीस कर्मचारी घरी जाण्याआधी पोलीस ठाण्यात प्रेशर फॉंगिंग सिस्टिम वापरून सॅनिटायझेशन कक्षाच्या फवाऱ्यातून गेल्यास त्या कर्मचार्यांचे निर्जंतुकीकरण होेत आहे.