वराडे येथे परराज्यातून आलेल्या एकावर गुन्हा दाखल 

गुजरात राज्यातून वराडे ता. कऱ्हाड येथे आलेल्या एकास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी न फिरता घरातच थांबण्यास सांगितलेल्या सूचनांचे पालन न करता तो सार्वजनिक तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल तसेच संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वराडे येथे परराज्यातून आलेल्या एकावर गुन्हा दाखल 

उंब्रज/प्रतिनिधी

गुजरात राज्यातून वराडे ता. कऱ्हाड येथे आलेल्या एकास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी न फिरता घरातच थांबण्यास सांगितलेल्या सूचनांचे पालन न करता तो सार्वजनिक तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल तसेच संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सोपान शिरसट वय-३४, रा. वराडे, ता. कऱ्हाड असे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयीताचे नाव आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वराडे ता. कऱ्हाड येथील गणेश शिरसट हा नोकरीनिमित्त गुजरात येथे वास्तव्यास असतो. जगभरातील कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तेथील कंपनीने त्याला सुट्टी दिल्याने तो आपल्या मूळ गावी वराडे येथे ता. २७ रोजी आला होता. त्यानंतर त्याने उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली होती. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला कोठेही सार्वजनिक ठिकाणी न फिरता राहत्या घरीच २८ दिवस राहण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान पोलिस हवालदार एच. डी. मुळीक वराडे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणेश शिरसट हा सार्वजनिक तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल तसेच संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गणेश शिरसट याच्याविरुद्ध तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार हेमंत मुळीक यांनी तशी त्याबाबतची तक्रार पोलिसांत दिली आहे.