अखेरपर्यंत 'शब्दांचे धन' मुक्त हस्ते देणारा ऐश्वर्यवान नेता!

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या आयुष्यातला शेवटचा लेख ठरला. नंतर सहाच दिवसांनी ते स्वतःच अनंताच्या प्रवासाला निघून गेले....  'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' ही तुकोबांची उक्ती प्रत्यक्षात आणणारे जे मोजके राजकारणी आहेत  त्यात अरुण जेटली यांचे नाव  कायम अग्रक्रमांकावर घेतले जात असे. आरडाओरड न करता तर्कशुद्ध युक्तिवाद करून ते राज्यसभेत विरोधकांना गप्प करीत असत. जेव्हा मोदींवर हुकुमशाहीचा आरोप झाला  तेंव्हा गोंधळातच बोलायला उभे राहिलेल्या जेटलींनी जर्मनीत 1930 मध्ये देण्यात आलेली "अॅडॉल्फ इस जर्मनी अंड जर्मनी इज अॅडॉल्फ" ही घोषणा आणि त्याचे काँग्रेसजनांनी केलेले देशीकरण काँग्रेसजनांना ऐकवले आणि त्या दिवशीचा गोंधळच बंद झाला होता. आजारपणामुळे हालचालींवर मर्यादा येत गेल्या अनेकदा रुग्णालयाची वारी करावी लागली तरी जेटलींची बुद्धी अखेरपर्यंत तल्लख होती. शब्दांच्या सहाय्याने त्यांनी राजकारणातला सक्रिय वावर कायम ठेवला होता. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेंव्हाही जेटलींची प्रकृती अजिबात बरी नव्हती... इतकी बरी नव्हती की, भाजप मुख्यालयात झालेल्या विजयाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडणेही त्यांना अशक्य होते. पण ब्लॉग, फेसबुक पोस्ट, ट्विट अशा नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून कायम त्यांनी आपली राजकीय सक्रियता कायम राखली होती. तीन तलाक प्रथेला बंदी असो किंवा दहशतवादावर कठोर प्रहार असो.. त्यावर जेटलींचे तज्ञ भाष्य येणार हे ठरलेले असे. जीएसटीच्या 2 स्लॅबच्या एकत्रीकरणाची शक्यता प्रथम वर्तवली त्यादिवशीही तो ब्लाग त्यांनी रुग्णालयातूनच लिहिला होता. काश्मीरला देणारे कलम 370 हे रद्द केले पाहिजे भारताच्या हातून निसटून जाणारे काश्मीर पुन्हा आहात आणता येईल मग त्यांनी राज्यसभेत अनेक वेळा मांडले होते तो ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी, साजरा करण्यासाठी त्यांच्या प्रकृतीने त्यांना संधी दिली नाही. मात्र 9 ऑगस्टला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या जेटलींनी  किंचित आराम पडताच आपल्या सहाय्यकाला बोलवून त्याला लेखाचा मजकूर सांगण्यास सुरुवात केली, आणि 'अशक्य ते शक्य केले' असे म्हणून पंतप्रधान मोदी व शहा यांचे अभिनंदन केले होते. 13 आॅगस्टला आलेल्या या ब्लॉगमध्ये जेटलींनी जम्मू-काश्मीरचा इतिहासच मांडला. या कलमाचा आधार घेऊन 1957, 1962, 1967 यासारख्या कितीतरी निवडणुका गडबड करून आणि विरोधकांचा आवाज दडपून टाकून जिंकल्या गेल्या. हे त्यांनी यात नेमके सांगितले. शेख अब्दुल्ला यांनी व तत्सम नेत्यांनी या राज्याला आपला व्यक्तिगत साम्राज्य बनवून लोकशाही कशी कमकुवत करत नेली, याचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता. काश्मीरमधून पळून यावे लागलेल्या पंडितांबद्दल जेटलीना विशेष आस्था होती. यातील अनेकांना त्यांनी दिल्लीत घडी बसवून देण्यासाठी अबोलपणे अतिशय मोलाची मदत केली. कलम 370 वर त्यांचा अखेरचा ब्लॉग, यातील अस्वस्थता नेमकेपणाने मांडणारे ठरला जम्मू काश्मीर व देशाच्याही इतिहासाला नवे वेगळे वळण देणारा एक ऐतिहासिक कायदा संसदेत मंजूर होत असताना काँग्रेसचे जे वर्तन होते त्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. एका अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत या राष्ट्रीय पक्षाने या कलमाला विरोध करून भारतीय राजकारणातील आपल्या 'राजकीय विरक्तीचे' रंग आणखी गडद केले आहेत ही टिप्पणी खास जेटली स्टाईल अशीच म्हणावी लागेल. आधी विरोधी पक्षनेते असताना आणि नंतर राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून काम पाहताना जेटलींच्या दालनामध्ये नियमितपणे पत्रकारांशी गप्पांचा कार्यक्रम चाले. जेटलींना दुर्मिळ पेन दुर्मिळ घड्याळे, कोट, दुर्मिळ शालींचा संग्रह करण्याची प्रचंड आवड होती. दर हिवाळ्यात त्यांच्या शाली पाहून नजमा हेपतुल्ला, सुमित्रा महाजन सारख्या भाजपने त्यादेखील त्याबद्दल आवर्जून चौकशी करत असत. एकदा त्यांनी लंडनला खरेदी केलेले एक नवे घड्याळ पत्रकारांना दाखवले ते असे घड्याळ होते प्रत्येक दिवसातला राहू काळ सुरू झाला की त्या घड्याळाची डायल राखाडी रंगाचे होत असे! पेन आणि त्यांची वैशिष्ट्ये या सार्‍यांच्या बाबतीत जगात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांकडे तसे असत.... एकदा लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ, संरक्षण आणि माहिती प्रसारण तिन्ही मंत्रालयाच्या सर्वच्या सर्व प्रश्नांना एकट्या जेटलींनी दिली. त्यादिवशी प्रश्न विचारणारे अनेक होते पण उत्तर देणारे एकच मंत्री होते ते म्हणजे अरुण जेटली! तिन्ही मंत्रालयाची त्यांना असलेली जाण पाहून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी ''आज तर तुम्ही गोवर्धन पर्वतच उचलला ' अशी पावती दिली. मोदी शहा कार्यकाळात राज्यसभेचे कामकाज वारंवार बंद पडत असताना विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढणारे जे मोजके नेते भाजपकडे होते आनंद कुमार आणि सुषमा स्वराज यांच्या पाठोपाठ अरुण जेटली हे नावही आज अंतर्धान पावले. Author Type: External Authorअरुण जेटलीभाजपमोदी सरकारजम्मूराजकारणीजर्मनीसरकारकलम 370विभागमंत्रालयसुषमा स्वराजNews Item ID: 599-blog-1566653828Site Section Tags: देशSearch Functional Tags: अरुण जेटली, भाजप, मोदी सरकार, जम्मू, राजकारणी, जर्मनी, सरकार, कलम 370, विभाग, मंत्रालय, सुषमा स्वराज

अखेरपर्यंत 'शब्दांचे धन' मुक्त हस्ते देणारा ऐश्वर्यवान नेता!

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या आयुष्यातला शेवटचा लेख ठरला. नंतर सहाच दिवसांनी ते स्वतःच अनंताच्या प्रवासाला निघून गेले.... 

'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' ही तुकोबांची उक्ती प्रत्यक्षात आणणारे जे मोजके राजकारणी आहेत  त्यात अरुण जेटली यांचे नाव  कायम अग्रक्रमांकावर घेतले जात असे. आरडाओरड न करता तर्कशुद्ध युक्तिवाद करून ते राज्यसभेत विरोधकांना गप्प करीत असत. जेव्हा मोदींवर हुकुमशाहीचा आरोप झाला  तेंव्हा गोंधळातच बोलायला उभे राहिलेल्या जेटलींनी जर्मनीत 1930 मध्ये देण्यात आलेली "अॅडॉल्फ इस जर्मनी अंड जर्मनी इज अॅडॉल्फ" ही घोषणा आणि त्याचे काँग्रेसजनांनी केलेले देशीकरण काँग्रेसजनांना ऐकवले आणि त्या दिवशीचा गोंधळच बंद झाला होता.

आजारपणामुळे हालचालींवर मर्यादा येत गेल्या अनेकदा रुग्णालयाची वारी करावी लागली तरी जेटलींची बुद्धी अखेरपर्यंत तल्लख होती. शब्दांच्या सहाय्याने त्यांनी राजकारणातला सक्रिय वावर कायम ठेवला होता. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेंव्हाही जेटलींची प्रकृती अजिबात बरी नव्हती... इतकी बरी नव्हती की, भाजप मुख्यालयात झालेल्या विजयाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडणेही त्यांना अशक्य होते. पण ब्लॉग, फेसबुक पोस्ट, ट्विट अशा नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून कायम त्यांनी आपली राजकीय सक्रियता कायम राखली होती. तीन तलाक प्रथेला बंदी असो किंवा दहशतवादावर कठोर प्रहार असो.. त्यावर जेटलींचे तज्ञ भाष्य येणार हे ठरलेले असे. जीएसटीच्या 2 स्लॅबच्या एकत्रीकरणाची शक्यता प्रथम वर्तवली त्यादिवशीही तो ब्लाग त्यांनी रुग्णालयातूनच लिहिला होता.

काश्मीरला देणारे कलम 370 हे रद्द केले पाहिजे भारताच्या हातून निसटून जाणारे काश्मीर पुन्हा आहात आणता येईल मग त्यांनी राज्यसभेत अनेक वेळा मांडले होते तो ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी, साजरा करण्यासाठी त्यांच्या प्रकृतीने त्यांना संधी दिली नाही. मात्र 9 ऑगस्टला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या जेटलींनी  किंचित आराम पडताच आपल्या सहाय्यकाला बोलवून त्याला लेखाचा मजकूर सांगण्यास सुरुवात केली, आणि 'अशक्य ते शक्य केले' असे म्हणून पंतप्रधान मोदी व शहा यांचे अभिनंदन केले होते. 13 आॅगस्टला आलेल्या या ब्लॉगमध्ये जेटलींनी जम्मू-काश्मीरचा इतिहासच मांडला. या कलमाचा आधार घेऊन 1957, 1962, 1967 यासारख्या कितीतरी निवडणुका गडबड करून आणि विरोधकांचा आवाज दडपून टाकून जिंकल्या गेल्या. हे त्यांनी यात नेमके सांगितले.

शेख अब्दुल्ला यांनी व तत्सम नेत्यांनी या राज्याला आपला व्यक्तिगत साम्राज्य बनवून लोकशाही कशी कमकुवत करत नेली, याचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता. काश्मीरमधून पळून यावे लागलेल्या पंडितांबद्दल जेटलीना विशेष आस्था होती. यातील अनेकांना त्यांनी दिल्लीत घडी बसवून देण्यासाठी अबोलपणे अतिशय मोलाची मदत केली. कलम 370 वर त्यांचा अखेरचा ब्लॉग, यातील अस्वस्थता नेमकेपणाने मांडणारे ठरला जम्मू काश्मीर व देशाच्याही इतिहासाला नवे वेगळे वळण देणारा एक ऐतिहासिक कायदा संसदेत मंजूर होत असताना काँग्रेसचे जे वर्तन होते त्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. एका अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत या राष्ट्रीय पक्षाने या कलमाला विरोध करून भारतीय राजकारणातील आपल्या 'राजकीय विरक्तीचे' रंग आणखी गडद केले आहेत ही टिप्पणी खास जेटली स्टाईल अशीच म्हणावी लागेल.

आधी विरोधी पक्षनेते असताना आणि नंतर राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून काम पाहताना जेटलींच्या दालनामध्ये नियमितपणे पत्रकारांशी गप्पांचा कार्यक्रम चाले. जेटलींना दुर्मिळ पेन दुर्मिळ घड्याळे, कोट, दुर्मिळ शालींचा संग्रह करण्याची प्रचंड आवड होती. दर हिवाळ्यात त्यांच्या शाली पाहून नजमा हेपतुल्ला, सुमित्रा महाजन सारख्या भाजपने त्यादेखील त्याबद्दल आवर्जून चौकशी करत असत. एकदा त्यांनी लंडनला खरेदी केलेले एक नवे घड्याळ पत्रकारांना दाखवले ते असे घड्याळ होते प्रत्येक दिवसातला राहू काळ सुरू झाला की त्या घड्याळाची डायल राखाडी रंगाचे होत असे! पेन आणि त्यांची वैशिष्ट्ये या सार्‍यांच्या बाबतीत जगात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांकडे तसे असत....

एकदा लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ, संरक्षण आणि माहिती प्रसारण तिन्ही मंत्रालयाच्या सर्वच्या सर्व प्रश्नांना एकट्या जेटलींनी दिली. त्यादिवशी प्रश्न विचारणारे अनेक होते पण उत्तर देणारे एकच मंत्री होते ते म्हणजे अरुण जेटली! तिन्ही मंत्रालयाची त्यांना असलेली जाण पाहून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी ''आज तर तुम्ही गोवर्धन पर्वतच उचलला ' अशी पावती दिली. मोदी शहा कार्यकाळात राज्यसभेचे कामकाज वारंवार बंद पडत असताना विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढणारे जे मोजके नेते भाजपकडे होते आनंद कुमार आणि सुषमा स्वराज यांच्या पाठोपाठ अरुण जेटली हे नावही आज अंतर्धान पावले.

Author Type: 
External Author
News Item ID: 
599-blog-1566653828
Search Functional Tags: 
अरुण जेटली, भाजप, मोदी सरकार, जम्मू, राजकारणी, जर्मनी, सरकार, कलम 370, विभाग, मंत्रालय, सुषमा स्वराज