पाकिस्तान : मुलींच्या आयुष्यात स्वातंत्र्य अन‌् परिवर्तनाचे माध्यम बनलीय सायकल; विरोधानंतरही बदलाचा वेग सातत्याने वाढताेय

कराची -कराचीच्या कस्टम हाऊससमाेरील चौकात दर रविवारी सकाळी ६ वाजता ३०-४० मुली सायकली चालवतात. ल्यारीतील अरुंद रस्त्यांवर त्या एवढ्या आत्मविश्वासाने सायकल चालवत असतात की, पाहणारे पाहतच राहतात. सुमारे दाेन तास त्या हेल्मेटखाली स्कार्फ घालून अशा प्रकारे आनंद लुटून घरी परततात. कराचीत असे १५ सायकलिंग ग्रुप बनवण्यात आले असून, ते मुलींना मुक्तपणे फिरण्यासह जीवन आनंदी करण्यास मदत करतात.या तरुणींच्या इन्स्ट्रक्टर झुलेखा दाऊद यांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीच्या सर्वात जुन्या भागांपैकी एक ल्यारी हा कधीकाळी कमी उत्पन्नाचा भाग हाेता; परंतु गत काही वर्षांत ताे युद्धभूमीत रूपांतरित झाला. अशा भागात मुलींनी नीडरपणे सायकल चालवणे माेठी बाब आहे. या वर्षी जानेवारीत मुलींच्या सायकल रॅलीला विरोध झाल्याने त्यावर बंदी घालण्यात आली; परंतु तरीही मुलींचा सायकल चालवण्याचा उत्साह कमी झालेला नाही. १५ वर्षीय गुल्लू बदरने सांगितले की, मी येथे कुणालाही न घाबरता सायकल चालवते. तसेच माझ्यासाेबत इतर मुलींना सायकल चालवताना पाहून आनंद मिळताे. झुलेखा सांगतात की, पाकिस्तानमध्ये असे दृश्य फारच कमी दिसते. मात्र, वीकेंडला अशा मुलींचे समूह वाढत असून, हा एक माेठा व सकारात्मक बदल आहे.३० वर्षीय आलिया मेमन सांगतात की, आमच्या देशातील पुरुषांना कुणी काही नवे केलेले सहजपणे रुचत नाही. त्यात मुली म्हटल्यावर तर विचारूच नका. मी आता १५ वर्षांनंतर सायकलिंग सुरू केले असून, यातून मला भावनात्मक ताकद मिळते व काही तरी माेठी कामगिरी केल्यासारखे वाटते. ३२ वर्षांच्या फैजा रिझवी यांनी सांगितले की, संस्कृतीचे कारण सांगून आम्हास नवे काही करण्यापासून राेखले जाते. २३ वर्षीय जमांग ज्वादून यांच्या मते मुली दुचाकी व रिक्षाही चालवू इच्छितात; परंतु विराेधामुळे तसे करू शकत नाहीत. तथापि, आता आमच्या सायकलींचा व बदलाचा वेग कमी हाेणार नाही. आम्ही स्वातंत्र्य व अधिकारांचे ध्येय निश्चितपणे गाठू.ग्रुपद्वारे सायकलिंगसाेबत सामाजिक जागरूकता निर्माणाचेही हाेतेय काम ल्यारी कॅफे, क्रिटिकल मास-कराची व सी.जी. रायडर्ससारखे सुमारे १५ ग्रुप रायडिंग कॅम्प व याच्याशी संबंधित उपक्रम घेतात. प्रत्येक ग्रुपमध्ये ३०-४० सदस्य आहेत. सायकलिंगशिवाय पोलिआे जनजागृती, रक्तदान, शिक्षणाचे महत्त्व आदी माहिती देतात. युद्ध-भांडणे, वादाच्या स्थितीत त्यामुळेांमुळे आनंद मिळताे, असे झुलेखाने सांगितले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today A bicycle made independence and transformation in girls' lives in Pakistan


 पाकिस्तान : मुलींच्या आयुष्यात स्वातंत्र्य अन‌् परिवर्तनाचे माध्यम बनलीय सायकल; विरोधानंतरही बदलाचा वेग सातत्याने वाढताेय

कराची -कराचीच्या कस्टम हाऊससमाेरील चौकात दर रविवारी सकाळी ६ वाजता ३०-४० मुली सायकली चालवतात. ल्यारीतील अरुंद रस्त्यांवर त्या एवढ्या आत्मविश्वासाने सायकल चालवत असतात की, पाहणारे पाहतच राहतात. सुमारे दाेन तास त्या हेल्मेटखाली स्कार्फ घालून अशा प्रकारे आनंद लुटून घरी परततात. कराचीत असे १५ सायकलिंग ग्रुप बनवण्यात आले असून, ते मुलींना मुक्तपणे फिरण्यासह जीवन आनंदी करण्यास मदत करतात.


या तरुणींच्या इन्स्ट्रक्टर झुलेखा दाऊद यांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीच्या सर्वात जुन्या भागांपैकी एक ल्यारी हा कधीकाळी कमी उत्पन्नाचा भाग हाेता; परंतु गत काही वर्षांत ताे युद्धभूमीत रूपांतरित झाला. अशा भागात मुलींनी नीडरपणे सायकल चालवणे माेठी बाब आहे. या वर्षी जानेवारीत मुलींच्या सायकल रॅलीला विरोध झाल्याने त्यावर बंदी घालण्यात आली; परंतु तरीही मुलींचा सायकल चालवण्याचा उत्साह कमी झालेला नाही. १५ वर्षीय गुल्लू बदरने सांगितले की, मी येथे कुणालाही न घाबरता सायकल चालवते. तसेच माझ्यासाेबत इतर मुलींना सायकल चालवताना पाहून आनंद मिळताे. झुलेखा सांगतात की, पाकिस्तानमध्ये असे दृश्य फारच कमी दिसते. मात्र, वीकेंडला अशा मुलींचे समूह वाढत असून, हा एक माेठा व सकारात्मक बदल आहे.

३० वर्षीय आलिया मेमन सांगतात की, आमच्या देशातील पुरुषांना कुणी काही नवे केलेले सहजपणे रुचत नाही. त्यात मुली म्हटल्यावर तर विचारूच नका. मी आता १५ वर्षांनंतर सायकलिंग सुरू केले असून, यातून मला भावनात्मक ताकद मिळते व काही तरी माेठी कामगिरी केल्यासारखे वाटते. ३२ वर्षांच्या फैजा रिझवी यांनी सांगितले की, संस्कृतीचे कारण सांगून आम्हास नवे काही करण्यापासून राेखले जाते. २३ वर्षीय जमांग ज्वादून यांच्या मते मुली दुचाकी व रिक्षाही चालवू इच्छितात; परंतु विराेधामुळे तसे करू शकत नाहीत. तथापि, आता आमच्या सायकलींचा व बदलाचा वेग कमी हाेणार नाही. आम्ही स्वातंत्र्य व अधिकारांचे ध्येय निश्चितपणे गाठू.


ग्रुपद्वारे सायकलिंगसाेबत सामाजिक जागरूकता निर्माणाचेही हाेतेय काम
ल्यारी कॅफे, क्रिटिकल मास-कराची व सी.जी. रायडर्ससारखे सुमारे १५ ग्रुप रायडिंग कॅम्प व याच्याशी संबंधित उपक्रम घेतात. प्रत्येक ग्रुपमध्ये ३०-४० सदस्य आहेत. सायकलिंगशिवाय पोलिआे जनजागृती, रक्तदान, शिक्षणाचे महत्त्व आदी माहिती देतात. युद्ध-भांडणे, वादाच्या स्थितीत त्यामुळेांमुळे आनंद मिळताे, असे झुलेखाने सांगितले.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
A bicycle made independence and transformation in girls' lives in Pakistan