बेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे

बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र, बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोनवाळ गल्लीतील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत केवळ एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी मराठी संघटना, संस्थांना प्रयत्न करण्याची गरज आहे. सीमाभागातील मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येतील वाढती घट चिंतेचा विषय बनला आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून त्याचा परिणाम मराठी शाळांवर होत आहे. मात्र, बेळगाव तालुक्‍यातील हुंचेनट्टीमधील स्थिती मराठीसाठी दिलासादायक आहे. येथील सरकारी मराठी शाळेतील पहिलीच्या वर्गात ६ तर सातवीपर्यंत २२ तेलगू भाषिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे याचा आदर्श मराठी भाषिक पालकांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हुंचेनट्टी तसे मराठी भाषिकांचे. पण, सध्या परराज्यातून येथे आलेल्या लोकांचीही संख्या अधिक आहे. येथे औद्योगिक वसाहतीतील कामगार, स्क्रॅप गोळा करणारे, स्टोव्ह दुरुस्ती करणारी मंडळीही अधिक आहेत. गावात तेलगू, नबानी भाषिक, गुजराती व मारवाडी समाजबांधवही वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथील तेलगू भाषिक विद्यार्थी सरकारी मराठी शाळेत शिकत आहेत. यावर्षी पहिलीच्या वर्गात सहा तेलगू भाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ६२ आहे. यापैकी २२ विद्यार्थ्यांची मातृभाषा तेलगू, नबानी आहे.  तेलगू व नबानी भाषिक पाच ते सहा वर्षांपासून मुलांना मराठी शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे या शाळेत मराठी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना इतर भाषिक विद्यार्थ्यांमुळे पटसंख्या सुधारली आहे. यामुळे तेलगू किंवा नबानी भाषिक मुले उत्कृष्टरित्या मराठी बोलत आहेत. यापासून प्रेरणा घेत सर्वांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्‍त होत आहे. आमच्या शाळेमध्ये ६२ विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी २२ विद्यार्थी तेलगू भाषिक आहेत. तसेच गुजरात व राजस्थानमधून आलेल्या कामगारांची मुलेही मराठीत शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांसाठी हे आशादायी चित्र आहे.  - एम. एम. कुंभार, सहशिक्षक, प्राथमिक मराठी शाळा, हुंचेनट्टी News Item ID: 599-news_story-1562491779Mobile Device Headline: बेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडेAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र, बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोनवाळ गल्लीतील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत केवळ एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी मराठी संघटना, संस्थांना प्रयत्न करण्याची गरज आहे. सीमाभागातील मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येतील वाढती घट चिंतेचा विषय बनला आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून त्याचा परिणाम मराठी शाळांवर होत आहे. मात्र, बेळगाव तालुक्‍यातील हुंचेनट्टीमधील स्थिती मराठीसाठी दिलासादायक आहे. येथील सरकारी मराठी शाळेतील पहिलीच्या वर्गात ६ तर सातवीपर्यंत २२ तेलगू भाषिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे याचा आदर्श मराठी भाषिक पालकांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हुंचेनट्टी तसे मराठी भाषिकांचे. पण, सध्या परराज्यातून येथे आलेल्या लोकांचीही संख्या अधिक आहे. येथे औद्योगिक वसाहतीतील कामगार, स्क्रॅप गोळा करणारे, स्टोव्ह दुरुस्ती करणारी मंडळीही अधिक आहेत. गावात तेलगू, नबानी भाषिक, गुजराती व मारवाडी समाजबांधवही वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथील तेलगू भाषिक विद्यार्थी सरकारी मराठी शाळेत शिकत आहेत. यावर्षी पहिलीच्या वर्गात सहा तेलगू भाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ६२ आहे. यापैकी २२ विद्यार्थ्यांची मातृभाषा तेलगू, नबानी आहे.  तेलगू व नबानी भाषिक पाच ते सहा वर्षांपासून मुलांना मराठी शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे या शाळेत मराठी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना इतर भाषिक विद्यार्थ्यांमुळे पटसंख्या सुधारली आहे. यामुळे तेलगू किंवा नबानी भाषिक मुले उत्कृष्टरित्या मराठी बोलत आहेत. यापासून प्रेरणा घेत सर्वांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्‍त होत आहे. आमच्या शाळेमध्ये ६२ विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी २२ विद्यार्थी तेलगू भाषिक आहेत. तसेच गुजरात व राजस्थानमधून आलेल्या कामगारांची मुलेही मराठीत शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांसाठी हे आशादायी चित्र आहे.  - एम. एम. कुंभार, सहशिक्षक, प्राथमिक मराठी शाळा, हुंचेनट्टी Vertical Image: English Headline: 22 Telgu students learn in Marathi medium in BelgaumAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाबेळगावशिक्षणeducationसरकारgovernmentमराठीमराठी शाळाशाळागुजरातवर्षाvarshaSearch Functional Tags: बेळगाव, शिक्षण, Education, सरकार, Government, मराठी, मराठी शाळा, शाळा, गुजरात, वर्षा, VarshaTwitter Publish: 

बेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे

बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र, बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोनवाळ गल्लीतील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत केवळ एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी मराठी संघटना, संस्थांना प्रयत्न करण्याची गरज आहे.

सीमाभागातील मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येतील वाढती घट चिंतेचा विषय बनला आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून त्याचा परिणाम मराठी शाळांवर होत आहे. मात्र, बेळगाव तालुक्‍यातील हुंचेनट्टीमधील स्थिती मराठीसाठी दिलासादायक आहे. येथील सरकारी मराठी शाळेतील पहिलीच्या वर्गात ६ तर सातवीपर्यंत २२ तेलगू भाषिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे याचा आदर्श मराठी भाषिक पालकांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हुंचेनट्टी तसे मराठी भाषिकांचे. पण, सध्या परराज्यातून येथे आलेल्या लोकांचीही संख्या अधिक आहे. येथे औद्योगिक वसाहतीतील कामगार, स्क्रॅप गोळा करणारे, स्टोव्ह दुरुस्ती करणारी मंडळीही अधिक आहेत. गावात तेलगू, नबानी भाषिक, गुजराती व मारवाडी समाजबांधवही वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथील तेलगू भाषिक विद्यार्थी सरकारी मराठी शाळेत शिकत आहेत. यावर्षी पहिलीच्या वर्गात सहा तेलगू भाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ६२ आहे. यापैकी २२ विद्यार्थ्यांची मातृभाषा तेलगू, नबानी आहे. 

तेलगू व नबानी भाषिक पाच ते सहा वर्षांपासून मुलांना मराठी शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे या शाळेत मराठी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना इतर भाषिक विद्यार्थ्यांमुळे पटसंख्या सुधारली आहे. यामुळे तेलगू किंवा नबानी भाषिक मुले उत्कृष्टरित्या मराठी बोलत आहेत. यापासून प्रेरणा घेत सर्वांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्‍त होत आहे.

आमच्या शाळेमध्ये ६२ विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी २२ विद्यार्थी तेलगू भाषिक आहेत. तसेच गुजरात व राजस्थानमधून आलेल्या कामगारांची मुलेही मराठीत शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांसाठी हे आशादायी चित्र आहे. 
- एम. एम. कुंभार,
सहशिक्षक, प्राथमिक मराठी शाळा, हुंचेनट्टी

News Item ID: 
599-news_story-1562491779
Mobile Device Headline: 
बेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
22 Telgu students learn in Marathi medium in Belgaum
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
बेळगाव, शिक्षण, Education, सरकार, Government, मराठी, मराठी शाळा, शाळा, गुजरात, वर्षा, Varsha
Twitter Publish: