कराडात ट्रक-दुचाकी अपघातात पती, पत्नी ठार

कोल्हापूर नाक्यावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी 20 रोजी दुपारी हा अपघात झाला. या अपघातात काले ता. कराड येथील पती, पत्नी ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

कराडात ट्रक-दुचाकी अपघातात पती, पत्नी ठार
कराड : अपघातग्रस्त दुचाकी

कराडात ट्रक-दुचाकी अपघातात दोन जण जागीच ठार 

मृतांमध्ये काले येथील पती, पत्नीचा समावेश 

कराड/प्रतिनिधी : 
         येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी 20 रोजी दुपारी हा अपघात झाला. या अपघातात काले ता. कराड येथील पती, पत्नी ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. 
          याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काले ता. कराड येथून दुचाकीवरून पती-पत्नी कराडला निघाले होते. ते पुणे-बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे आले असता महामार्गावरून शहरात प्रवेश करत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले. 
         सदर अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील,  पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीस सुरुवात केली आहे. 
         कोल्हापूर नाका येथे महामार्गावरून शहरात प्रवेश करताना यापूर्वी अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. आजही झालेल्या अपघातात दोघा पती-पत्नींना आपले प्राण गमवावे लागल्याने नागरिकांसह प्रवाशांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. 
         तसेच या ठिकाणी महामार्गावर उड्डाणपूल होण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पुलाचे अद्याप रखडल्याने तात्काळ मार्गी लावावे, अशी मागणीही प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.