खोडशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन ठार

खोडशी ता. कराड येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर अपघातात जखमी झालेल्या लहान मुलाला उपचारासाठी रुग्णायात नेताना त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

खोडशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन ठार
अपघातग्रस्त दुचाकी

खोडशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन ठार

मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश : अज्ञात वाहन चालकाची घटनास्थळावरून धूम  

कराड/प्रतिनिधी : 
       
खोडशी ता. कराड येथे अज्ञात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर अपघातात जखमी झालेल्या लहान मुलाला उपचारासाठी रुग्णायात नेताना त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. मंगळवारी 23 रोजी रात्री 8. 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. 
        सोमनाथ जनार्दन पवार (वय 24) व विक्रम माणिक पवार (वय 26) दोघेही रा. कुमठे ता. जि. सातारा असे अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अपघातातील उपचारासाठी रुग्णायात नेताना उपचारापूर्वीच मृत्यू झालेल्या लहान मुलांचे नाव (वय अंदाजे 8 ते 9 वर्ष) समजू शकले नाही. 
       
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून तिघेजण दुचाकीवरून सातारच्या दिशेने निघाले होते. रात्री 8. 30 वाजण्याच्या सुमारास खोडशी गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भिषण होती की, यामध्ये दुचाकीवरील तिघेजण महामार्गावर इतरत्र फेकले गेले. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर अपघातातील जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णायात नेताना त्याचाही  उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून धूम ठोकली. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
        अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे इंचार्ज दस्तागिर आगा, मानसिंग सूर्यवंशीअमित पवारजितेंद्र भोसले, घाडगे, कुंभार, निकम, नाईक आदी. घटनास्थळी दखल झाले. दरम्यान, अपघाताबाबतची माहिती कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे खलील इनामदार व प्रशांत जाधव, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी तात्काळ  घटनास्थळी दखल झाले. महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तीनही मृतांना रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस व महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.