"कृष्णा"मधून 20 जण कोरोना मुक्त,हॉस्पिटलच्या परिश्रमाला आले मोठे यश,आज घरी सोडणार

कराड साठी मोठा दिलासा देणारी बातमी आज कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मधून एकाचवेळी 20 रुग्ण होणार कोरोनामुक्त झाले असून हॉस्पिटलच्या परिश्रमाला आले मोठे यश आले आहे.

 

आज कृष्णा हॉस्पिटलचे 20 जण कोरोनमुक्त; आज सोडणार घरी

सातारा दि. 20 (जिमाका) :

आज कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेले, कराड तालुक्यातील  वनमासमाची येथील 7, साकुर्डी येथील 2, आगाशिवनगर येथील 4, उंब्रज येथील 1, गोटे येथील 1, बनवडी येथील 1, गमेवाडी येथील 1, तांबवे येथील 1, मलकापूर  येथील 1 व साताऱ्यातील शाहूपुरी येथील 1 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
★★★★★★★★★★★★★★★★★★

मंगळवारी दिवसभरात 28 पॉझिटीव्ह रुग्णांनी जिल्हा हादरला असताना कराड तालुक्यातील 20 रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने दिलासा मिळाला आहे. 

कराड तालुक्यातील आत्तापर्यंत 54 पॉजिटिव्ह रुग्ण पूर्ण बरे होऊन कृष्णेतुन सुखरूप गेले घरी आज दुपारी 3:30 वाजता बऱ्या झालेल्या 20 कोरोनामुक्ताना घरी सोडणार सोडणार असून एकाचवेळी 20 रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने कृष्णा हॉस्पिटलचे होतेय विशेष कौतुक.कराड तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे .तब्बल 20 रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी सोडण्यात येणार आहेत.कृष्णा हॉस्पिटल च्या यशस्वी उपचारामुळे आज कराड तालुक्यातील 20 रुग्णांना आज दुपारी 3 : 30 वाजता डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अशी माहिती कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.

★★★★★★★★★★★★★★★★★★