कराड कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

तहसिलदार कोरेगाव, फलटण, माण व कराड महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम व.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये तसेच आपले तालुक्यात उपलब्ध असलेले अधिकारी/कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन दि.२३/०२/२०२१ ते दि.२४/०२/२०२१ या कालावधीतील एक तारीख संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपलेस्तरावरुन निश्चित करुन द्यावी. संबंधित प्रामपंचायतींची सरपंच व उपसरपंच पदाची निवडीची कार्यवाही पुर्ण करुन केले कार्यवाहीचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करणेत यावा.

कराड  कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग
कराड  कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

कराड  कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

कराड/प्रतिनिधी

कराड  कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला होणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी पारित केला असून चार तालुक्यातील सरपंच निवडी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे राजकारण चांगलेच रंगात येणार आहे

सोबत जिल्हाधिकारी यांचा आदेश

 

१) महाराष्ट्र प्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम २८(१०.३० व ३३
२) या कार्यालयाकडील आदेश क.क्र.साशा/प्राप/आरआर-४/५६/२१ दि. ०१/०२/२०२१
३) या कार्यालयाकडील आदेश क्र.क्र.साशा/ग्राप/आरआर-४/१९५/२१ दि. ०६/०२/२०२१
जिलाधिकारी कार्यालय सातारा
क्र.साशा/ग्राप/आरमार-४/१७५/२१
सातारा:-दि.१७/०२/२०२१

आदेश

ज्याअर्थी, वाचले क्र.२ अन्व्ये जिल्हयातील सर्व तालुकेतील ज्या ग्रामपंचायतीची कार्यकारणी गठीत होत आहे अशा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीच्या पहिल्या विशेष सभेसाठी दि ०८/०२/२०२१ ते दि.१०/०२/२०२१ ही तारीख निश्चित करणेत आलेली होती.ज्याअर्थी, कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कराड या तालुकेतील तहसिलदारांनी दि. २९/०१/२०२१ रोजी संबंधित तालुकेतील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे विविध प्रवर्गासाठी राखून ठेवणेच्या केलेल्या कार्यवाहीवर नाराज होऊन संबंधित तालुकेतील काही प्रामपंचायतीमधील सदस्य / प्रामस्थ यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. सदर रिट याचिकामध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई, यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ग्रामपंचायतीमधील सरपंच व उपसरपंच पदाची निवड दि.
१६/०२/२०२१ पर्यंत घेणेत येऊ नये असे निर्देशित केलेले आहे. त्यामुळे कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कराड या पाच तालुकेतील ग्रामपंचातीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी दि. १६/०२/२०२१ पर्यंत राबून ठेवण्यात आलेल्या आहेत.ज्याअर्थी, कोरेगाव, फलटण, माण व कराड चार या तालुकेतील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्य आरक्षणा सोडतीवर मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे दाखल झालेल्या याचिकेतील याचिकाकर्ता यांचया मागण्या अमान्य करण्यात आलेल्या आहेत. सबब, कोरेगाव, फलटण , माण व कराड या चार तालुकेतील ज्या प्रामपंचायतीची कार्यकारणी गठीत होत आहे त्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीचा प्रथम सभेचा दिनांक निश्चित करून देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसपंच यांच्या निवडणूकीचा प्रथम सभेचा दिनांक निश्चित करणेचा व अध्यासी अधिकारी नियुक्त करणेचा अधिकार संबंधित
जिल्हाधिकारी यांना आहे.ज्याअर्थी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३ ) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसपंच यांच्या निवडणूकीचा प्रथम सभेचा दिनांक निश्चित करणेचा व अध्यासी अधिकार नियुक्त करणेचा
अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना आहे. सातारा जिल्हयात निवडणूक झालेल्या प्रामपंचायतींची संख्या जास्त असलेने तसेच तालुक्यात उपलब्ध असलेले अधिकारी / कर्मचारी यांची संख्या लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच / उपसरपंच निवडणूकीची
पहिली विशेष सभा एकाच दिवशी घेणे शक्य होणार नाही.
त्याअर्थी, मी शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा महाराष्ट्र प्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये आदेशित करतो की, कोरेगाव , फलटण, माण व कराड या चार तालुकेतील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीपैकी ज्या प्रामपंचायतीची कार्यकारणी गठीत होत आहे अशा, ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीच्या पहिल्या विशेष सभेसाठी दि. २३/०२/२०२१ ते दि.२४/०२/२०२१ ही तारीख निश्चित करणेत येत आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेसाठी अध्यासी अधिकारी नेमून देणेकामी संबंधित तालुकेचे तहसिलदार यांना प्राधिकृत करीत आहे.सदर ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीच्या पहिल्या विशेष सभेवेळी केंद्र व राज्य शासनाने कोविड -१९ बाबत वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली शासन अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीचे काटेकोर पालन करावे.

(शेखर सिंह)
जिल्हाधिकारी सातारा