'कोरोना' बाबत खाजगी डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे मार्गदर्शन

प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे सोशल डीस्टस ची काळजी घेऊन परिसरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायीक डॉक्टर्स यांना जागतिक महामारी कोरोना महामारी संदर्भात दैनंदिन ओपीडी किंवा इतर अत्यावश्यक सेवा देताना कशा पध्दतीने काळजी घ्यावी ,तसेच अनुमानित रूग्णांची तपासणी करताना काय करायला पाहिजे व कोरोना विषाणूंच्या साथीच्या अनुषंगाने दवाखाना आणि डॉक्टर्स विरोधी अफवा,अशा प्रकारच्या अनेक अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

'कोरोना' बाबत खाजगी डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे मार्गदर्शन

उंब्रज/प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे सोशल डीस्टस ची काळजी घेऊन परिसरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायीक डॉक्टर्स यांना जागतिक महामारी कोरोना महामारी संदर्भात दैनंदिन ओपीडी किंवा इतर अत्यावश्यक सेवा देताना  कशा पध्दतीने काळजी घ्यावी ,तसेच अनुमानित  रूग्णांची तपासणी करताना काय करायला पाहिजे व कोरोना विषाणूंच्या साथीच्या अनुषंगाने  दवाखाना आणि डॉक्टर्स विरोधी  अफवा,अशा प्रकारच्या अनेक अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी उंब्रज मेडिकल असोसिएशन च्या वतीने सुचना करण्यात आली.कोरोना संशयित डॉक्टरांची तपासणी आणि रिपोर्ट येईपर्यंत रूग्णालयात इतर रूग्णाप्रमाने त्याच वॉर्डमध्ये अॅडमिट केले जाते,परंतु संसर्गामुळे कोरोना आजार होऊ शकतो ,त्यासाठी कोरोना संशयित डॉक्टर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी या  मागणीसाठी वरीष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.कोरोना महामारीच्या लढाई मध्ये डॉक्टर ,पॅरा मेडिकल स्टाफ ,नर्सेस ,पोलिस अधिकारी ,कर्मचारी ,तसेच विविध वृत्तपत्राचे ,वाहीन्यांचे  पत्रकार यांचे  कामाबद्दल डॉ.संजय कुंभार वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांनी कौतुक केले ,या काळात खाजगी दवाखाने सुरू राहतील ,तसेच नागरीकांनी लॉकडाउन काळात अतिशय चांगले सहकार्य केले,तसेच अजून पुढे अशीच खबरदारी नागरीकांनी घ्यावी ,शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे,बाधीत क्षेत्रातील व्यक्ती ,किंवा काही त्रास जाणवणारी नागरिक यांनी शासकीय यंत्रणेला संपर्क साधावा,कोरोना ची साखळी तोडण्यासाठी केवळ आणि केवळ आपण घरीच थांबा,हीच  खरी देशभक्ती आहे,आणि याद्वारे आपण सर्वजण मिळून मानवजातीवर आलेले कोरोनारूपी महामारीचे संकट हद्दपार करू शकतो .असे डॉ संजय कुंभार यांनी सांगितले .

कोरोना संशयित डॉक्टरना वेगळी व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करणार

रुग्णांना सेवा देत असताना बँक हिस्ट्री माहीत नसल्याने कोरोना चा धोका उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा आहे.यामुळे भविष्यात जर कोरोना संशयित म्हणून डॉक्टरांचे नाव पुढे आले तर त्यांना दिले जाणारे उपचार हे "डॉक्टर स्पेशालिस्ट"विभागात व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.यामुळे सर्वच डॉक्टरांनी आपली ओपीडी चालू ठेवावी प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज त्यांना सर्व ते सहकार्य निश्चितच करेल