विनाकारण भटकणाऱ्या दोघांवर गुन्हे, मोटारसायकली जप्त मसूर येथील घटना

संचारबंदी असताना विनाकारण मोटारसायकलवर रोड वर फिरणारे दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करून मसूर ता.कराड येथे दुचाकी वरून मास्क न लावता मानवी जिवनाची सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी उंब्रज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

विनाकारण भटकणाऱ्या दोघांवर गुन्हे, मोटारसायकली जप्त  मसूर येथील घटना

उंब्रज / प्रतिनिधी

संचारबंदी असताना विनाकारण मोटारसायकलवर रोड वर फिरणारे दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत
जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करून मसूर ता.कराड येथे दुचाकी वरून मास्क न लावता मानवी जिवनाची सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी उंब्रज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


सनी राजेंद्र मोहिते रा. मातंगवस्ती,गणेश रघुनाथ जाधव रा.खडकपेठ दोघेही रा.मसूर ता.कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.

यातील संशयित आरोपी यांनी आपसात संगणमत करून  आपले ताब्यातील दुचाकी मो.सा. क्र. एम.एच.५० एफ. ४१२० व एम. एच.१२ ए .वाय .६६०० ही वाजवी कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी रोडवर आपले तोंडास मास्क न लावता  व सुरक्षित तेच्या  दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता फिरून त्यांनी बेदरकारपणे मानवी जीवितास व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याचे घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उलंघन करताना मिळून आले आहेत संशयितांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केली केले आहे म्हणून वगैरे मजकुराच्या खबरी वरून भा.द.वि कलम १८८,५१(ब )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.